सोलापूर

सोलापूर : संभाजी ब्रिगेडतर्फे संभाजीराजेंच्या मूर्तीची स्थापना

Shambhuraj Pachindre

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  छत्रपती संभाजी महाराज यांच्या 366 व्या जयंतीछत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड संचलित स्वराज रक्षक शंभूराजे मध्यवर्ती मंडळाच्या वतीने आसरा चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या जल्लोषात करण्यात आली. यानिमित्त मिरवणूक काढण्यात आली.

शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून मूर्तीची पूजा करण्यात आली. यावेळी मंडळाचे संस्थापक श्याम कदम, उत्सव अध्यक्ष अरविंद शेळके, नरेश घोरपडे, पंकज काटकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, छात्रवीर प्रतिष्ठानचे शिरीष जगदाळे, शेखर जगदाळे, कवी राम माने, कुपवाड येथील जवान घोषभूषण काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कल्याणनगर ते आसरा चौक या मार्गावरून छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशभूषेतील कार्यकर्ते बबन डिंगणे यांची उंटावरून मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज हे थोर साहित्यिक आणि कवी असल्याचा संदर्भ देत ते बुधभूषण लिहितानाचा सजीव देखावाही मिरवणुकीत सादर करण्यात आला होता. तसेच छत्रपती संभाजी महाराज लिखित बुधभूषण नाईकाभेद सातशतक आणि नखशिखा या चार ग्रंथांचे डिजिटल बॅनर लावण्यात आले होते.

जयंतीनिमित्त विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. गरिबांना धान्याचे किट देण्यात आले होते. संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम घेण्यात आला. यातील विजेत्यांना चांदीची नाणी भेट स्वरुपात देण्यात आले.

आज वधू-वर मेळावा

रविवारी आबासाहेब किल्लेदार मंगल कार्यालयात उपवधू- वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मूर्ती प्रतिष्ठापनेवेळी संभाजी ब्रिगेडचे सिताराम बाबर, रमेश चव्हाण, अमित गायकवाड, किशोर कदम, ओंकार कदम, सचिन होनमाने, नितीन होनमाने, संजय चव्हाण, दादा चव्हाण, अमोल सलगर, अमित गायकवाड, तेजस गायकवाड, पिल्लू पवार, विनोद राठोड, सुलेमान पीरजाडे, विलास पाटील, सिद्धेश्वर पाटील, राजेंद्र माने, संतोष धोत्रे, सागर शिंदे, अनिकेत कबाडे, गजानंद शिंदे आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT