मोहोळ; पुढारी वृत्तसेवा : मोहोळ तालुक्यातील पेनुर येथील विवाहितेने स्वतःसह दोन लहान मुलांना विषारी औषध पाजून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवार (दि.13) रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली. त्यांना उपचारासाठी पंढरपूरच्या रुग्णालयात दाखल केले असता विवाहितेचा व तिच्या सहा महिन्याच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असुन लहान मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.
प्रियंका सुरज चवरे (वय ३०) तसेच अद्याप नाव ठेवलं नसलेली सहा महिन्यांची चिमुकली (रा. पेनूर, ता. मोहोळ) अशी मृतांची नावे असून शंभूराजे सुरज चवरे (वय ४) याची प्रकृती चिंताजनक आहे. आत्महत्येतचे कारण समजले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे पेनुर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान मोहोळ व पंढरपूर पोलिसात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्यात आलेली नव्हती.