सोलापूर

सोलापूर विद्यापीठ : परीक्षेस हजर ५० विद्यार्थी निकालात दाखवले गैरहजर

निलेश पोतदार

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बी.ए. भाग तीनच्या इतिहास विषयाच्या परीक्षेस सुमारे ५० हून अधिक विद्यार्थी हजर राहूनही गैरहजर दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचा निकाल या एका विषयाच्या गैरहजेरीने नापास लागला आहे. एकीकडे हजेरीपत्रकावर हजेरी, तर दुसरीकडे निकालावर गैरहजर असा परीक्षा विभागाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेचा गोंधळ काही केल्या संपायचे नाव घेत नाही. यावर्षीच्या परीक्षेची सुरुवातच वादापासून झाली आहे. विद्यापीठ व विद्यार्थी संघटनांमध्ये विविध प्रकारच्या वादविवाद घटना घडल्या. विद्यार्थी संघटनेकडून परीक्षासंदर्भात विविध प्रकारच्या मागण्यांसाठी विद्यापीठांसमोर आंदोलने, निदर्शने करण्यात आली. विद्यापीठाकडून सुरुवातीला दीर्घोत्तरी प्रश्नपत्रिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता; पण विद्यार्थी व परीक्षेस हजर ५० परीक्षार्थी निकालात दाखवले गैरहजर) विद्यार्थी असताना देखील परीक्षा संपून दोन महिने संघटनेकडून बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने झाले, तरी अद्याप निकाल सत्र सुरूच आहे.

परीक्षा घेण्यात याव्यात या मागणीसाठी विद्यापीठासमोर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संघटनांनी आक्रमक होऊन निदर्शने केली. त्यामुळे विद्यापीठाला आपला निर्णय बदलण्यास भाग पाडले. या गोंधळातून सावरत असतानाच पुन्हा विद्यार्थ्यांच्या हजेरीनंतरही गैरहजेरी व नापास प्रकरणाची भर पडली आहे. गेल्या १४ जुलै रोजी घेण्यात आलेल्या बीए भाग तीनच्या इतिहास विषयाच्या प्राचीन भारताचा इतिहास परीक्षेला विद्यार्थी हजर होते. तरीही अशा सुमारे ५० हून अधिक विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबर रोजी देण्यात आलेल्या निकालामध्ये चक्क गैरहजर दाखवून नापास म्हणून जाहीर करण्यात आले आहे. हा प्रकार शिवाजी नाईट कॉलेज या सेंटरवर परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडला आहे.

यामध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यासंबंधी विद्यार्थी पालक व महाविद्यालय यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. घडलेल्या प्रकारचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या प्रकारामुळे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र अडचण निर्माण झाली आहे. यंदाची सोलापूर विद्यापीठाची परीक्षा चर्चेचा विषय ठरला आहे. परीक्षा दरम्यान, विद्यापीठ परीक्षाकडून अनेक लहान, मोठ्या चुका घडत गेल्या. कधी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना मिळण्यास विलंब होत होता, तर कधी चुकीची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येत होती. उर्दू सारख्या विषयांमध्ये तर अक्षरश : प्रश्नपत्रिकांवरच उत्तराच्या खुणा होत्या. विद्यापीठ प्रशासन व पेपर तयार करण्याच्या शिक्षकांच्या चुकांचे खापर विद्यार्थ्यांच्या माथ्यावर फोडण्यात आले. विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागले. याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागला. परीक्षा संपल्यानंतर ४५ दिवसात निकाल लागणे अपेक्षित असताना देखील परीक्षा संपून दोन महिने झाले तरी अद्याप निकाल सत्र सुरूच आहे.

या गोंधळातून सावरत असतानाच पुन्हा विद्यार्थ्यांच्या हजेरीनंतरही गैरहजेरी व नापास प्रकरणाची भर पडली आहे. गेल्या १४ जुलै रोजी घेण्यात आलेल्या बीए भाग तीनच्या इतिहास विषयाच्या प्राचीन भारताचा इतिहास परीक्षेला विद्यार्थी हजर होते. तरीही अशा सुमारे ५० हून अधिक विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबर रोजी देण्यात आलेल्या निकालामध्ये चक्क गैरहजर दाखवून नापास म्हणून जाहीर करण्यात आले आहे. हा प्रकार शिवाजी नाईट कॉलेज या सेंटरवर परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडला आहे. यामध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यासंबंधी विद्यार्थी पालक व महाविद्यालय यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे . घडलेल्या प्रकारचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकारामुळे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र अडचण निर्माण झाली आहे.

निकाल नापास असल्याचे दिसते. ज्या विद्यार्थ्यांचा निकाल गैरहजर दाखवत आहे अशा विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाकडे आपल्या तक्रारी द्याव्यात. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांची यादी तयार करून तसे पत्र विद्यापीठात द्यावे. तत्काळ त्याची दखल घेऊन निकाल दुरुस्त करून देण्यात येईल.

– डॉ . शिवकुमार गणपुर, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ सोलापूर विद्यापीठ.

परीक्षेला विद्यार्थी उपस्थित असताना देखील गैरहजर दाखवण्यात आले. या घटनेचे विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन विद्यार्थ्यांचे निकाल दुरुस्त करण्यात यावेत. तसेच यासंबंधी दोषी आढळणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा विद्यापीठासमोर अंदोलन करण्यात येईल.

मल्लेश कारमपुरी, जिल्हा सचिव, स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया

SCROLL FOR NEXT