सोलापूर

सोलापूर : विदेशीवर देशी दारूची मात

अमृता चौगुले

सोलापूर : धनंजय मोरे :  सन 2021-22 या वर्षात सोलापूर जिल्ह्यात 70 लाख 6 हजार लिटर विदेशी दारू तर 84 लाख 61 हजार लिटर देशीदारू जिल्ह्यातील दारू शौकिनांनी रिचविली.

'मुझे पिने का…शौक नहीं, पिता हुँ , गम भुलाने को' हे एका चित्रपटातील 'गीत' आज ही, दारू शौकिनांच्या ओठावर असते. दारू पिणार्‍यांना दारू पिण्यासाठी फक्त कारण लागते. एखाद्या मित्राचा वाढदिवस असला किंवा एखाद्या मित्राचे निधन झाले तरी सुख आणि दु:ख हे दोन्ही विसरण्यासाठी दारू शौकिनांना 'दारू' लागतेच. या व अशा कारणांमुळे जिल्ह्यातील दारू शौकिनांनी वाईनशॉप, परमीट रूम अशा ठिकाणी विक्री होण्यार्‍या ठिकाणांहून मागील वर्षी सन 2020-2021 या वर्षात 54 लाख 64 हजार लिटर विदेशी दारू प्राशन केली. चालू वर्षात सन 2021-22 मध्ये 70 लाख 6 हजार लिटर विदेशी दारू रिचवून शासनाला महसूल मिळवून दिला.

विदेशी दारूबरोबरच देशी दारू शौकिनांचे प्रमाणसुद्धा खूप आहे. त्यामुळे देशीदारू विक्रीचे प्रमाण सुध्दा मोठे आहे. मागील वर्षी सन 2020-21 या वर्षात मद्यपींनी 71 लाख 10 हजार लिटर देशीदारू रिचविली. तर या वर्षात सन 2021-22 या वर्षात 84 लाख 61 हजार लिटर दारू रिचवली.

या आकडेवारीवरून समजते की, मागील सन 2020-21 या वर्षापेक्षा व चालू वर्षात सन 2021-22 या वर्षात दारू पिणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील दारू शौकिनांच्या संख्येत सुद्धा वाढ होत आहे.

SCROLL FOR NEXT