सोलापूर

सोलापूर : महापालिकेच्या निवारा केंद्रात आठ बेघर दाखल

अमृता चौगुले

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  शहरात रस्त्याच्या कडेला,फुटपाथवर, रेल्वे-बसस्थानक, विविध धार्मिक स्थळांसमोर बसलेल्या आठ बेघर नागरिकांना महापालिका व सामाजिक संस्थेच्या मदतीने बेघर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले.

महानगरपालिकेतील दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व जय भारतमाते सेवावृद्धी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम हाती घेण्यात आली. या बेघरांचे आधी समुपदेशन केल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात नेऊन आरोग्य तपासणी करण्यात आली.

तद्नंतर त्यांना बेघर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर आणि उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. या केंद्रात बेघरांना राहण्या-जेवणाची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली, अशी माहिती महापालिका शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी यांनी दिली. यगा मोहिमेत मुलाणी यांच्यासह बेघर निवारा केंद्र व्यवस्थापक अशोक वाघमारे, इफ्तार शेख, महानगरपालिका समूह संघटक वसीम शेख, सत्यजित वडावराव, नागेश क्षीरसागर, शशिकांत वाघमारे, सागर गायकवाड आणि बेघर निवारा केंद्र काळजीवाहक भरतसिंग राजपूत सहभागी झाले होते.

SCROLL FOR NEXT