सोलापूर : पुढारी वृत्तसेवा सोलापुरात पे्रमसंबंधात अडथळा ठरणार्या पत्नी स्नेहा उदार (वय 29, रा. उद्धवनगर, सैफुल) हिला पती राहुल राजाभाऊ उदार याने फिनेल पाजवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. राहुल याच्या प्रेयसीनेही स्नेहाला दवाखान्यात जाऊन 'माझे नाव घेतले तर बघून घेण्याची' धमकी दिली. याप्रकरणी राहुल व प्रेयसी या दोघांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, राहुल व स्नेहा यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. परंतु राहुलचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याची स्नेहाला माहिती मिळाली. यातून वादही निर्माण झाला.
दरम्यान, स्नेहा ही या दोघांच्या प्रेमात अडथळा ठरत होती. त्यामुळे राहुलने स्नेहाला घराच्या बाथरूममध्ये जबरदस्तीने नेऊन तिला फिनेल पाजले. तू याबद्दल कोणाला काही सांगितल्यास तुला सोडणार नाही' अशी धमकी दिली.
स्नेहाला त्रास होऊ लागल्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान प्रेयसी ही हॉस्पिटलमध्ये गेली. तेथे तिने 'तू माझे नाव कोठे घेऊ नको, जर घेतले तर तुला बघून घेईन,' अशी स्नेहाला धमकी दिली. याप्रकरणी स्नेहाने पती व प्रेयसीविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.