सोलापूर

सोलापूर : पावसाच्या प्रतीक्षेत तिबेटियन विक्रेते

दिनेश चोरगे

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  तिबेटियन रेनकोट विक्रेते हे वर्षानुवर्षापासून सोलापूरमध्ये पावसाळा व हिवाळा या ऋतूमध्ये रेनकोट, जर्किन, स्वेटर, छत्री, टोपी अशा विविध नावीन्यपूर्ण वस्तूंची विक्री करत असतात. पण यंदा मात्र अपेक्षित पाऊस झाला नसल्यामुळे ग्राहकांच्या अत्यंत अल्प प्रतिसादमुळे विक्रेत्यांची चिंता वाढली आहे. प्रत्येक व्यवसाय हा ऋतूप्रमाणे अवलंबून असतो.

तिबेटियन रेनकोट विक्रेत्यांचा हा व्यवसाय पावसावर अवलंबून असल्यामुळे मागील महिन्यात फारसा पाऊस झाला नसल्यामुळे रेनकोट, जर्किनला फारशी मागणी सोलापूरवासीयांकडून होताना दिसून आली नाही. कोरोनाच्या काळात या विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. इंधनाचे दर वाढले असल्याने वाहतुकीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला. यामुळे या वस्तूंच्या किंमतीत 20 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

 हे व्यावसायिक बाहेरुन माल विक्रीसाठी सोलापुरात घेऊन येतात. या लोकांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर असल्यामुळे अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यास दुकानाचे भाडे, उदरनिर्वाहाचा खर्च कसा भागवायचा, अशी चिंता तिबेटियन विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

SCROLL FOR NEXT