सोलापूर

सोलापूर : पाकणीत 930 पोती गुटखा, तंबाखू जप्त

अमृता चौगुले

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर तालुका पोलिसांनी शनिवारी रात्री पाकणी येथे 930 पोती गुटखा व सुगंधी तंबाखू पकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली असून हा गुटखा नेमका कोठून कोठे जात होता, याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले प्रशिक्षणार्थी साहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी सोलापूर पोलीस ठाण्याकडील डीबी पथकाला माहिती दिली. त्यावरून पथकाने पाकणीत दोन्ही वाहनांची (एमएच 46 एएफ 6117 आणि एचआरएस एक्स 8051) तपासणी केली असता त्यात पांढर्‍या प्लास्टिक पोत्यांत गुटखा व सुगंधी तंबाखू असल्याचे दिसून आले.

साहाय्यक पोलीस अधीक्षक कार्तिक यांना खबर्‍याकडून माहिती मिळाली होती की, विजापूर रोडवरील तेरामैल येथून हे दोन्ही कंटेनर गुटखा घेऊन तुळजापूरच्या दिशेने जाणार आहेत. त्यावरून त्यांनी पोलीस कर्मचार्‍यांना मार्फत ही कारवाई केली.
पाकणी जवळील हॉटेल वासुदेव या ठिकाणी दोन्ही कंटेनर अडवून त्यांची तपासणी केली. त्यामध्ये हिरा पान मसाला व रॉयल 717 तंबाखूची 930 पोती आढळून आली. या गुटख्याची किंमत एक कोटी 74 हजार रुपये असून दोन्ही कंटेनरमध्ये असलेला मिळून एक कोटी 45 लाख 74 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.
याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी नंदिनी हिरेमठ यांच्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स पांगे, पोलीस हवालदार संजय देवकर, पोलीस नाईक अनंत चमके, नागेश कोणदे, गणराज जाधव, रवींद्र साबळे, सिद्धलिंग बिराजदार, कानडे यांनी केली.

विजापूर रोडवरील तेरामैल येथून हे दोन्ही कंटेनर गुटखा घेऊन तुळजापूरच्या दिशेने जाणार आहेत. त्यावरून त्यांनी पोलीस कर्मचार्‍यांना मार्फत ही कारवाई केली. पाकणी जवळील हॉटेल वासुदेव या ठिकाणी दोन्ही कंटेनर अडवून त्यांची तपासणी केली. त्यामध्ये हिरा पान मसाला व रॉयल 717 तंबाखूची 930 पोती आढळून आली. या गुटख्याची किंमत एक कोटी 74 हजार रुपये असून दोन्ही कंटेनरमध्ये असलेला मिळून एक कोटी 45 लाख 74 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती नंदिनी हिरेमठ यांच्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स पांगे, पोलीस हवालदार संजय देवकर, पोलीस नाईक अनंत चमके, नागेश कोणदे, गणराज जाधव, रवींद्र साबळे, सिद्धलिंग बिराजदार, कानडे यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT