सोलापूर

सोलापूर : जागेच्या कारणावरून तळेहिप्परगामध्ये मारहाण

Arun Patil

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : जागेच्या कारणावरून तळेहिप्परगा (ता. उत्तर सोलापूर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात तरुणास गोळ्या घालण्याची धमकी देत मारहाण करणार्‍या सहाजणांविरुद्ध सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संजय गजेंद्र शिंदे (वय 40, रा. तळेहिप्परगा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संतोषकुमार लक्ष्मण भिंगारे, सचिन लक्ष्मण भिंगारे, रोहन संतोषकुमार भिंगारे, प्रशांत मच्छिंद्र पाटील, दादा दिगंबर भिंगारे, विनोद दिगंबर भिंगारे (सर्व रा. तळेहिप्परगा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

20 जून रोजी दुपारी संजय शिंदे हे तळेहिप्परगा ग्रामपंचायत कार्यालयात बसले होते. त्यावेळी संतोषकुमार भिंगारे व त्याच्या साथीदारांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन जागेच्या कारणावरून तुला गोळ्या घालीन, तुला आता जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत लाथाबुक्क्याने जबर मारहाण करुन शिंदे यांना जखमी केले. अशी नोंद सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT