सोलापूर

सोलापूर : चुकीच्या सर्व्हिस रस्त्याप्रश्नी रास्ता रोको

अमृता चौगुले

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा : 
महामार्ग विस्तारीकरण कामाअंतर्गत शहर हद्दीतील अक्कलकोट रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने सर्व्हिस रोड व पावसाळी पाण्याच्या लाईनचे काम होत आहे. ते काम थांबवण्याबाबत पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी रविवारी रास्ता रोको आंदोलन केले. याबाबत तत्काळ निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा, देण्यात आला. दरम्यान, आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

राष्ट्रीय महामार्ग क्र. 150 वरील 137/60 ते 137/420 याठिकाणी सर्व्हिस रस्ता व पावसाळी पाण्याच्या लाईनचे काम चुकीच्या पद्धती सुरू आहे. रस्त्याच्या कडेला पावसाळी पाण्याची गटार बांधण्यात येत आहे, मात्र ही लाईन सर्व्हिस रस्त्याच्या तीन ते चार फूट उंचीवर आहे. रस्ता व पावसाळी पाण्याची लाईन समांतर असणे गरजेचे आहे. मात्र पावसाळी पाण्याची लाईन ही गरजेपेक्षा जास्त उंचावर बांधण्यात येत आहे.

रहिवाशांच्या म्हणण्यानुसार रस्त्याच्या समांतर किंवा अर्धा-एक फूट उंचीवर ही लाईन असणे अपेेक्षित आहे. मात्र त्या पद्धतीने काम होत नसल्याने भविष्यात आसपासच्या नागरी वसाहतींमध्ये पावसाचे पाणी तुंबण्याचा धोका आहे. यासंदर्भात रहिवाशांनी गत तीन महिन्यांपासून नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया, मनपा आयुक्त, लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करीत आहेत. यावर रहिवाशांना फक्त आश्वासनच मिळत आहे. नुकतेच या परिसरातील रहिवाशांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांचा सत्कार करीत
गांधीगिरी पद्धतीने आंदोलनही केले. यावर अधिकार्‍यांनी पुन्हा आश्वासनापलीकडे काहीच न केल्याने संतप्त रहिवाशांनी रविवारी सकाळी सादूल पेट्रोलपंपानजीक रास्ता रोको आंदोलन केले.

यामध्ये आमदार प्रणिती शिंदे व माजी नगरसेवक शशिकंत केंची यांच्यासह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.
या आंदोलनामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली. परिणामी रस्त्याच्या दुतर्फा शेकडो वाहने थांबली होती.

पद्धतीने आंदोलनही केले. यावर अधिकार्‍यांनी पुन्हा आश्वासनापलीकडे काहीच न केल्याने संतप्त रहिवाशांनी रविवारी सकाळी सादूल पेट्रोलपंपानजीक रास्ता रोको आंदोलन केले. यामध्ये आमदार प्रणिती शिंदे व माजी नगरसेवक शशिकंत केंची यांच्यासह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली. परिणामी रस्त्याच्या दुतर्फा शेकडो वाहने थांबली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT