सोलापूर

साेलापूर : चालकाला बांधून सळई भरलेला ट्रक पळविला

अमृता चौगुले

मोहोळ : पुढारी वृत्तसेवा :  शेटफळ (ता. मोहोळ) येथे ट्रक चालकाला बंदूक आणि तलवारीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी सळईचा ट्रक पळविला. शनिवारी (4 जून) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दहशत माजवत दरोडेखोरांनी हा प्रकार केला.

यावेळी खिशातील रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रेही त्यांनी लांबविली. याप्रकरणी प्रवीण अंबादास सरगर (वय 35, रा. नाझरा ता. सांगोला) याने मोहोळ पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, प्रवीण सरगर हे 1 जून रोजी मालट्रक (एम.एच. 10 झेड 1352) घेऊन जालना येथे गेले होते. तीन जून रोजी ते मालट्रकमध्ये स्टील सळई भरून कुर्डूवाडी पंढरपूर मार्गाने माघारी निघाले होते. ते 4 जून रोजी पहाटे तीन वाजता शेटफळ गावच्या हद्दीत पोहोचले होते. यावेळी गाडीची ताडपत्री काचेवर आल्याने प्रवीण सरगर यांनी गाडी थांबवून ताडपत्री व्यवस्थित करत होते. यावेळी एका कारमधून आलेल्या सहाजणांपैकी चौघांनी सरगर यांना पकडून उसाच्या शेतात नेले. तलवार आणि बंदुकीचा धाक दाखविला.

यावेळी सरगर यांनी आरडाओरड सुरू केली. पण दरोडेखोरांनी त्याला खल्लास करून टाकेन, अशी धमकी दिली. तसेच त्यांचे हात-पाय बांधून डोळ्याला काळी पट्टी बांधली. त्यानंतर चोरट्यांनी प्रवीण सरगर यांच्या खिशातील वीस हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल, ड्रायव्हिंग लायसेन्स, पॅनकार्ड, आधार कार्ड, गाडीचे आर.सी. बुक इत्यादी कागदपत्रांसह 20 टन स्टीलने भरलेला मालट्रक असा 13 लाख 61 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

पहाटे पाच वाजता कसाबसा प्रयत्न करून सरगर यांनी हाता-पायास बांधलेली दोरी सोडली व ते रस्त्यावर आले. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या एका वस्तीवर जाऊन त्यांनी 100 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून घडल्याप्रकाराबाबत पोलीसांंन माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सरगर यांना पोलिस ठाण्यात आणून फिर्याद नोंदविली. पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार सहा अज्ञातांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे., घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांनी भेट दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे करीत आहेत.

याबाबत माहिती अशी की, प्रवीण सरगर हे 1 जून रोजी मालट्रक (एम.एच. 10 झेड 1352) घेऊन जालना येथे गेले होते. तीन जून रोजी ते मालट्रकमध्ये स्टील सळई भरून कुर्डूवाडी पंढरपूर मार्गाने माघारी निघाले होते. ते 4 जून रोजी पहाटे तीन वाजता शेटफळ गावच्या हद्दीत पोहोचले होते. यावेळी गाडीची ताडपत्री काचेवर आल्याने प्रवीण सरगर यांनी गाडी थांबवून ताडपत्री व्यवस्थित करत होते. यावेळी एका कारमधून आलेल्या सहाजणांपैकी चौघांनी सरगर यांना पकडून उसाच्या शेतात नेले.

तलवार आणि बंदुकीचा धाक दाखविला. यावेळी सरगर यांनी आरडाओरड सुरू केली. पण दरोडेखोरांनी त्याला खल्लास करून टाकेन, अशी धमकी दिली. तसेच त्यांचे हात-पाय बांधून डोळ्याला काळी पट्टी बांधली. त्यानंतर चोरट्यांनी प्रवीण सरगर यांच्या खिशातील वीस हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल, ड्रायव्हिंग लायसेन्स, पॅनकार्ड, आधार कार्ड, गाडीचे आर.सी. बुक इत्यादी कागदपत्रांसह 20 टन स्टीलने भरलेला मालट्रक असा 13 लाख 61 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. पहाटे पाच वाजता कसाबसा प्रयत्न करून सरगर यांनी हाता-पायास बांधलेली दोरी सोडली व ते रस्त्यावर आले. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या एका वस्तीवर जाऊन त्यांनी 100 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून घडल्याप्रकाराबाबत पोलीसांंन माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सरगर यांना पोलिस ठाण्यात आणून फिर्याद नोंदविली. पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार सहा अज्ञातांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे., घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांनी भेट दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे करीत आहेत.

SCROLL FOR NEXT