सोलापूर

सांगोला नगरपरिषदेच्या विकासकामांसाठी 10 कोटी मंजूर

backup backup

सांगोला : पुढारी वृत्तसेवा सांगोला शहरातील विविध विकास कामांना महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून 10 कोटी रुपयांचा निधी काल मंजूर झाल्याची माहिती आ. शहाजीबापू पाटील यांनी दिली. यापूर्वी शहरातील विविध विकास कामांसाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नवीन दहा कोटी रुपये मंजूर झाल्याने गेल्या वर्षभरामध्ये एकूण 30 कोटी रुपये सांगोला नगरपरिषदेस मंजूर झाले आहेत. शिवाय वंदेमातरम् चौक ते मिरज रोड बायपास रस्त्याला अधिकचा नवीन 5 कोटी रुपयांचा निधी या आठवड्यामध्ये मंजूर होणार असल्याची माहिती आ. शहाजीबापू पाटील यांनी दिली.

मंजूर झालेल्या निधीतून भिममनगर येथे दीक्षाभूमी कट्ट्या समोर सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी दीड कोटी, साठेनगर येथे अंगणवाडी व अभ्यासिका बांधण्यासाठी 50 लाख, आरक्षण क्रमांक 47 चिंचोली रोड बगीच्या विकसित करण्यासाठी 1 कोटी, सांगोला शहर गावठाण नवीन वसाहत व वाड्यावस्त्यासाठी पाण्याची नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी 2 कोटी 50 लाख, जय भवानी चौक येथील आरक्षण क्रमांक 24/1 शॉपिंग सेंटर वरती पहिल्या मजल्यावर दुकान गाळे बांधण्यासाठी 2 कोटी, महादेव मंदिरा समोर सभामंडप बांधण्यासाठी 40 लाख, कोपटे वस्ती गणपती मंदिराजवळ बहुउद्देशीय सभागृह बांधण्यासाठी 25 लाख, इंगोले पट्टा समाज मंदिर बांधणे 15 लाख, गेजगे वस्ती समाज मंदिर बांधणे 15 लाख, खारवटवाडी हनुमान मंदिर येथे समाज मंदिर बांधणे 15 लाख, सुतार- भुईटे वस्ती येथे समाज मंदिर बांधणे 15 लाख, चिंचोली रोड ते पश्चिमेस सर्वे नंबर 548 रस्ता करणे 20 लाख, चिंचोली रोड सर्व्हे नंबर 521 व 548 मधून पश्चिमेस रस्ता करणे 50 लाख, बिलेवाडी भाऊसोा गायकवाड सुभाष देशमुख शेत रस्ता करणे 20 लाख, पंढरपूर रोड ते सोपान बिले विहीर ते प्राथमिक शाळा रस्ता करणे 35 लाख, असे एकूण 15 कामांसाठी 10 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

SCROLL FOR NEXT