सोलापूर

सलगर येथे आजपासून जय हनुमान कारहुणवी यात्रा महोत्सवाचे आयोजन

backup backup

हंजगी : पुढारी वृत्तसेवासलगर (ता. अक्कलकोट) येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्री जय हनुमान कारहुणवी यात्रेनिमित्त मंगळवार, 14 जूनपासून विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवारी व्हन्नुगीनिमित्त पहाटे श्री हनुमान मूर्तीस महारुद्राभिषेक, सकाळी कळसारोहण, दुपारी पालखी उत्सव, नंदीध्वज, कुंभ, मिरवणूक दोरसहीत पालखी व रथोत्सव कार्यक्रम, सायंकाळी 7 वाजेपर्यंत भव्य मिरवणूक प.पू.श्री रेवणसिध्देश्वर स्वामी यांच्या सानिध्यात शोभेचे दारूकाम व रथोत्सव कार्यक्रम, रात्री 10 वाजता जय हनुमान पारिजात भजनी मंडळ व श्री महादेव भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम होणार आहे.

बुधवारी (दि. 15) कारहुणवी यात्रा महोत्सव पहाटे 3 ते सकाळी 7 पर्यंत दंडवत व सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत बैलांची सवाद्य मिरवणूक, त्यानंतर मंदिर परिसरात दुपारी 12 ते सायंकाळी 5.30 पर्यंत कारहुणवी बैलगाड्या पळविण्याचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 10 वाजता श्री जय हनुमान नवतरुण कन्नड सामाजिक नाटकाचा प्रयोग होणार आहे.

गुरुवारी (दि. 16) दिवसभर श्री अक्कमहोदवी भजनी मंडळासह साकीन महल (ऐनापूर, विजयपूर), मुख्य गायिका भारतरत्न पुरस्कार विजेत्या शोभा व श्री यल्लालिंगेश्वर भजनी मंडळाचा (ता. सिंदगी जि.विजयपूर) मुख्य गायक धानम्मा तळवार यांचा भजन कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी ( दि. 17 ) कन्नड नाटकाचा दुसरा प्रयोग होणार आहे.

SCROLL FOR NEXT