सोलापूर

राज्य नाट्य स्पर्धेसाठी 15 सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

अमृता चौगुले

सोलापूर : पुढारी वृत्‍तसेवा :  राज्यात 15 नोव्हेंबरपासून राज्य नाट्य स्पर्धेस सुरुवात होत आहे. राज्यातील विविध केंद्रांवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यासाठी स्पर्धकांनी 15 सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन सांस्कृतिक विभागाने केले आहे.
शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्य नाट्य स्पर्धा सुरू होणार आहेत. स्पर्धेसाठी हौशी नाट्य संस्थांकडून 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर, 2022 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

61 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी 15 नोव्हेंबरपासून राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर होणार आहे. तसेच 61 व्या महाराष्ट्र राज्य हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी 1 जानेवारी 2023 पासून प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. 19 व्या राज्य बालनाट्य स्पर्धेची स्पर्धेची प्राथमिक फेरी 1 जानेवारी 2023 पासून 10 केंद्रांवर आयोजित करण्यात येणार असून दिव्यांग बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी फेब्रुवारी 2023 मध्ये होणार आहे.

नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्य नाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध होतील. पुणे महसूल विभागातील संस्थांनी, सहायक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT