सोलापूर

मोडनिंबचा पाणीप्रश्‍न पेटला

अमृता चौगुले

मोडनिंब : पुढारी वृत्तसेवा :  पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या मोडनिंब शहराचा पाणीपुरवठा 35 दिवस बंद आहे. मोडनिंबच्या पाणीपुरवठा प्रश्न पेटला असून निषेध म्हणून आज ग्रामपंचायत कार्याला विरोधकांनी टाळे ठोकले. ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी आश्वासन देताच हे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले.

ऐन पावसाळ्यातदेखील ग्रामपंचायत पाणीपुरवठा करू शकत नाही परिणामी पावसाचे छतावरील येणारे पाणी भरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. याची दखल घेत विरोधकांचे डोळे उघडले आणि त्यांनी आज मोडनिंब ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. माजी सरपंच कुरण गिड्डे ऍडव्होकेट विजय सिंह गिड्डे शिवाजी सुर्वे संजीव शिंदे सुमारे 82 लाखाच्या वर ग्रामपंचायतकडे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे थकीत बिल राहिल्याने सध्या पाणीपुरवठा बंद आहे. ऐन उन्हाळ्यात देखील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती करावी लागली. मोडनिंब ग्रामपंचायत चा पाणी पुरवठा कधी सुरळीत होणार? असा प्रश्न सध्या नागरिक विचारत आहेत.

तब्बल 72 लाख रुपये थकीत लाईट बिलामुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने येवती तलावातील वीज पुरवठा कनेक्शन महावितरणने तोडले आहे. या शिवाय सुर्वे प्रांत येथील जलशुद्धीकरण केंद्राचाही वीजपुरवठा सुमारे 12 लाख रुपये लाईट बिल थकल्याने तोडण्यात आला आहे परिणामी नागरिकांची पाण्याविना गैरसोय सुरू आहे. येवती (ता. मोहोळ) येथील ब्रिटिशकालीन पाझर तलावातून पाइपलाइनद्वारे मोडनिंब शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहरानजीक असलेल्या सुर्वे प्रांत येथील जलशुद्धीकरण केंद्राततून पाणी शुद्ध करून शहरातील शिवाजीनगर आणि स्टेशन रोड येथील जलकुंभ भरले जातात. यानंतर नळाद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो.

यापूर्वी महावितरणला काही रक्कम जमा केल्याने काही काळासाठी वीज पुरवठा जोडण्यात आला होता. ग्रामपंचायतकडे वसूल होणारी रक्कम ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला जमा करत आहे मात्र ही रक्कम अत्यंत तुटभुंजी असल्याने व्याजामध्ये जमा होत आहे परिणामी महावितरण ची मूळ बाकी तसेच राहत असल्याने महावितरण ग्रामपंचायतला सहकार्य करू शकत नाही. ग्रामपंचायतने वेळेत बिल न भरल्याने आता मात्र महावितरणने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे अवघड झाले आहे. मोडनिंब ग्रामपंचायतीच्या काही ठिकाणी बोरवेल्स असून वेळेवर देखभाल न करणे त्याही बंद अवस्था आहेत. याकडेही ग्रामपंचायत प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दोन्ही कार्यालयांची वीज बिले भरावी लागणार

मोडनिंब शहराला पाणी पुरवठा येवती तलावातून होत असून या तलावातील विद्युत मोटरची बिल हे मोहोळ येथील वीज मंडळाच्या कार्यालयात भरावे लागते. तर सुर्वे प्रांत येथील जलशुद्धीकरण केंद्र मोडनिंब येथे असल्याने येथील विद्युत मोटारींचे बिल हे टेंभुर्णी येथील वीज कार्यालयात भरावे लागते. ग्रामपंचायत प्रशासनाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला सहकार्य करून बिल भरावे यामध्ये लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करू नये, अशी सूचना आमदार बबनराव शिंदे यांनी केली आहे मोडनिंब येथे एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आल्यानंतर ते बोलत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT