सोलापूर

बार्शी नगरपरिषद : महिलांसाठी 50 टक्के जागा आरक्षित

Arun Patil

बार्शी ; पुढारी वृत्तसेवा : आगामी होत असलेल्या बार्शी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात प्रशासकीय कामकाजाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड आणि मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शीतील 21 प्रभाग आणि 42 सदस्यांसाठी होणार्‍या निवडणुकीतील महिलांच्या आरक्षणाची प्रक्रिया चिठ्ठी पध्दतीद्वारे बार्शीतील स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथे पार पडली. यावेळी उपमुख्याधिकारी जयसिंग खुळे, लेखापाल मीनाक्षी वाकडे, अश्‍विनी जाधव, आप्पासाहेब राऊत, तुषार खडके उपस्थित होते.

50 टक्के आरक्षित महिलांच्या 21 जागांमध्ये अनुसूचित जातीसाठी 4, यात प्रभाग क्र. 5, 12, 17 आणि 19 यांचा समावेश आहे. अनुसूचित जमातीसाठीचा प्रभाग क्र.16 हा स्त्रियांसाठी जाहीर झाला. सर्वसाधारणमध्ये प्रभाग 1, 2, 3, 4, 6, 8, 9, 10, 11, 13, 14, 15, 18, 20, 21 या प्रभागांतील भाग 'अ' यांचा महिलांसाठी राखीवमध्ये समावेश झाला.

याप्रसंगी माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांनी शासनाच्या सोडत पद्धतीमध्ये सदोष असल्याबाबतची शंका व्यक्त करत सभागृहाचे लक्ष वेधले. प्रत्येक प्रभागांतील 'अ' आणि 'ब' या दोन सदस्यांपैकी नेमका कोणता सदस्य हा राखीव असेल, याबाबत स्पष्टता नसल्याने वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेण्याबाबतही यावेळी सूचना करण्यात आली.

माजी नगरसेवक अशोक बोकेफोडे यांनीही, भीमनगर परिसर मागील अनेक निवडणुकांमध्ये महिलांसाठी राखीव ठेवला जातो. असेच जर प्रत्येक निवडणुकीत होत राहिले तर अन्यायकारक होणार असल्यामुळे आपण योग्य ठिकाणी दाद मागणार असल्याचे सांगितले. मुख्याधिकारी पाटील यांनी याबाबत हरकती नोंदविण्यासाठी असलेली मुदत उपस्थितांना यावेळी सांगितली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT