सोलापूर

तितर पक्ष्याची शिकार करणार्‍यास अटक

backup backup

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा वन परिक्षेत्र सोलापूर यांच्या क्षेत्रातील मौजे कुरघोट या गावात तितर पक्ष्याची शिकार करणारे आरोपी नागनाथ अण्णप्पा खुटेकर (वय 55) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा मौजे कुरघोट येथील रहिवासी असून तो तितर पक्ष्याची शिकार करताना नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कल सोलापूर या वन्यजीवप्रेमी संस्थेचे सदस्य साहिल सनधी यांनी पकडले व त्वरीत वन विभागास माहिती दिली. माहितीआधारे वन परिक्षेत्र अधिकारी डी. पी. खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस.ई. सावंत व वनरक्षक टी. एम. बादणे हे घटनास्थळी त्वरित पोहोचून त्यांनी आरोपीस ताब्यात घेतले.

या आरोपीवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 2, 9, 39 व 51 अन्वये वन गुन्हा क्रमांक 21 नोंद करुन दस्ताऐवज तयार केले आहेत. या आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी वन्यजीवांची शिकार करू नये व वन्यजीवांची शिकार करताना आढळल्यास त्वरित वन विभाग सोलापूर यांच्याशी संपर्क करावा किंवा वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT