सेालापूर : पुढारी वृत्तसेवा :
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने गट व गण रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला आहे. त्यासाठी बुधवारी अंतिम मुदत असून आजअखेर जिल्हा प्रशासनाकडे सुमारे 35 हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकतींवर जिल्हाधिकार्यांचा अभिप्राय देऊन विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी सांगितले. यावर 14 जूनला विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होणार असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा परिषदेसाठी नव्याने प्रसिद्ध झालेल्या गट रचनेत काही तालुक्यांत गट वाढले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी पूर्वी 68 गट होते, तर आता 77 गट झाले आहेत. पंचायत समितीसाठी 154 गण झाले आहेत. यामध्ये अनेक गांवाची तोडफोड करून नव्याने गट आणि गण निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे काही इच्छुकांना ही प्रारूप गट आणि गण रचना सोयीची, तर काहींना गैरसोयीची झाली
आहे.
त्यामुळे प्रशासनाच्या या प्रारूप आराखड्यावर हरकती दाखल झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 9 हरकती पंढरपूर तालुक्यातून दाखल झाल्या आहेत, तर करमाळा 6, बार्शी 6, मोहोळ 3, मंगळवेढा 4, माढा 3, दक्षिण सोलापूर 3, तर अक्कलकोट तालुक्यातून 1 हरकत दाखल झाली आहे. बुधवार दिनांक 8 जुन पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत हरकती दाखल करण्याचा शेवट दिवस आहे.
त्यामुळे बुधवारी आणखी काही हरकती दाखल होण्याची शक्यता आहे. आलेल्या हरकतीवर जिल्हा प्रशासनाचा अभिप्राय नोंदवून त्या हरकती विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येणार आहेत.तसेच यासाठी विभागीय आयुक्त 14 जुन रोजी पुणे येथे आलेल्या हरकतदारांची सुनावणी घेवून अंतिम निर्णय देणार आहेत.त्यानंतर अंतिम प्रारुप आराखडा 22 जून रोजी प्रसिध्द करणार आहेत.
त्यामुळे प्रशासनाच्या या प्रारुप आराखड्यावर हरकती दाखल झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 9 हरकती पंढरपूर तालुक्यातून दाखल झाल्या आहेत तर करमाळा 6, बार्शी 6, मोहोळ 3, मंगळवेढा 4, माढा 3, दक्षिण सोलापूर 3, तर अक्कलकोट तालुक्यातून 1 हरकत दाखल झाली आहे. बुधवार दिनांक 8 जुन पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत हरकती दाखल करण्याचा शेवट दिवस आहे.त्यामुळे बुधवारी आणखी काही हरकती दाखल होण्याची शक्यता आहे. आलेल्या हरकतीवर जिल्हा प्रशासनाचा अभिप्राय नोंदवून त्या हरकती विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येणार आहेत.तसेच यासाठी विभागीय आयुक्त 14 जुन रोजी पुणे येथे आलेल्या हरकतदारांची सुनावणी घेवून अंतिम निर्णय देणार आहेत.त्यानंतर अंतिम प्रारुप आराखडा 22 जून रोजी प्रसिध्द करणार आहेत.