करमाळा : पुढारी वृत्तसेवा : अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या तालुकाप्रमुख वर्षा चव्हाण यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक रिक्त पदे असल्याने आरोग्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. कर्मचार्यांची संख्या कमी असल्याने केम प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णांवर योग्य उपचार होत नाहीत. त्यामुळे ही रिक्त पदे त्वरित भरावीत, अन्यथा करमाळा तालुका शिवसेना महिला महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, केम करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. या गावाची लोकसंख्या पंधरा हजारांच्या आसपास आहे तसेच आरोग्य केंद्रातील एकूण 17 गावे जोडली आहेत. यामध्ये निंभोरे, कंदर, घोटी, पांगरे ही चार उपकेंद्रे आहेत. या आरोग्य केंद्रात 22 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 12 पदे रिक्त आहेत. यामध्ये आरोग्य सेवक चार, आरोग्य सहायक, औषध निर्माण अधिकारी एक, कनिष्ठ लिपिक, लॅब टेक्निशियन, आरोग्य सेविका अशी एकूण 22 पदे रिक्त आहेत. सध्या केम आरोग्य केंद्रात एकच डॉक्टर आहेत.
आरोग्य केंद्रातून डॉक्टरची नेमणूक आहे. परंतु येथील संतोष पालखी यांचा कार्यकाल संपल्याने येथील एकाच डॉक्टरांवर कामाचा ताण पडत आहे. त्यातच कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता असल्याने लसीकरण मोहीम तीव्र करण्याचा आदेश आलेला आहे. त्या अनुशषंगाने आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम सुरू आहे. अशा वेळेस दवाखान्यात रुग्णालयाच्या गोळ्या घ्यायलासुद्धा कर्मचारी नसतो. तसेच, या आरोग्य केंद्रात दररोजची ओपीडी संख्या वाढत आहे. त्यामुळे या आरोग्य केंद्रातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी; अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष वर्षा चव्हाण यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.