सोलापूर

कामगारांची नोंदणी पारदर्शकपणे करा : डॉ. सुरेश खाडे

Arun Patil

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी प्राधान्याने, पारदर्शकतेने व गतीने करा. सर्व घटकांतील कामगारांची नोंदणी करा व कामगारांसाठी असणार्‍या सर्व योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत त्वरेने पोहोचवा, असे निर्देश राज्याचे कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले आहेत.

कामगारनमंत्री खाडे हे शुक्रवारी सोलापूर दौर्‍यावर आले होते. कामगार विभागाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी सहायक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड, सरकारी कामगार अधिकारी विलास गायकवाड, नोंदणी अधिकारी ए. जी. पठाण, माजी महापौर श्रीकांचना यन्नम उपस्थित होते. कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन बांधण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्याचे कामगार भवन बांधण्यासाठी जागा पाहणी करावी. ईएसआय ह़ॉस्पिटलच्या धर्तीवर कामगारांसाठी दवाखाना उभारण्यासाठी एमआयडीसीमध्ये जागा उपलब्धतेसाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा.

नाक्यावरच्या बांधकाम कामगारांसाठी निवारा शेड उभारावेत, असे निर्देश त्यांनी दिले. इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत बांधकाम कामगारांसाठी असणार्‍या सर्व योजनांचा लाभ तळागाळातील बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचवावा.शासन आपल्या दारी अभियानांतर्गत बांधकाम व अन्य सर्व कामगारांच्या नोंदणीला व योजनांच्या लाभवाटपाला प्राधान्य द्यावे, असे सूचित करून, मंत्री डॉ. खाडे यांनी विडी कामगार, यंत्रमाग कामगारांची नोंदणी होण्याच्या दृष्टीने केंद्र शासन स्तरावरून प्रयत्न केले जातील. कामगार घरकुल योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत, त्याला मंजुरी देण्यात येईल, असे स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT