सोलापूर : जुळे सोलापुरातील म्हाडा कॉलनीत एका 16 वर्षीय विद्यार्थ्याने बुधवारी (दि.23) गळफास घेऊन जीवन संपवले होते. या विद्यार्थ्याने लिहिलेली चिठ्ठी सापडली असून स्वप्नात माझी आई आली होती, जास्त तणावात आहेस का, तू माझ्याकडे ये, असे ती म्हणाली त्यामुळे मी आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे.
शिवशरण भुताळी तळकोटी (वय 16, रा. ससाणे कॉलनी, केशव नगर, पुणे, सध्या रा. म्हाडा कॉलनी, जुळे सोलापूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. शिवशरणला दहावीच्या परीक्षेत 92 टक्के गुण मिळाले होते. काही महिन्यांपूर्वी त्याच्या आईचे काविळीच्या आजाराने निधन झाले होते. मामा महादेव तोळनुरे यांनी त्याला पुढील शिक्षणासाठी सोलापुरात आणले होते. आई गेल्यापासून शिवशरण हा तणावात होता. त्याच तणावातून त्याने आत्महत्या करीत जीवन संपवले. याबाबत विजापूर नाका पोलिस अधिक तपास करीत आहेत.
माझी आई गेली तेंव्हाच मी जायला पाहिजे होते. आई काल स्वप्नात आली होती. जास्त तणावात आहेस का माझ्याकडे ये म्हटल्याने मी मरणाचा विचार केला. ताईला सुखात ठेव, आजीला पप्पांकडे पाठवू नको माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे, अशा ओळी चिठ्ठीत लिहिल्या आहेत.