Crime  Pudhari
सोलापूर

Solapur News : सोशल मीडियातील रील्सचा वाद; तरुणास मारहाण

जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : एकीकडे ‘जेन झी’नी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशात वादळ उठवले असतानाच दुसरीकडे याच सोशल मीडियाचा ‘जेन झी’च्‍या मनावर विपरीत परिणाम होत असल्याचे समोर येत आहे. सोलापुरात अशी एक घटना घडली असून, माझ्या इन्‍स्‍टाग्राम अकाऊंटवरील रील्‍स व फॉलोअर्स का कमी केले, अशी विचारणा करत एका तरुणास दोघांनी मारहाण केली आहे. विशेष म्‍हणजे, या मारामारीतील सर्व तरुण १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.

रोहित व्‍हनप्‍पा गोडनवरू (रा. भवानी पेठ) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. रोहित हा १ ऑगस्‍ट रोजी रात्री नऊच्‍या सुमारास घराजवळ बसला होता. यावेळी संशयित तिथे आला. माझ्या इन्‍स्‍टाग्रामवरील रील्‍स व फॉलोअर्स तू का कमी केले, असे म्‍हणत रोहितला शिवीगाळ केली. लोखंडी कड्याने डोक्‍यात मारून जखमी केले. त्‍याचवेळी तेथे आलेल्या दुसऱ्या तरुणानेही रोहितला मारहाण केली. रोहितचा मावस भाऊ सतीश वडलर हा सोडविण्यासाठी आला असता, त्‍यालाही मारहाण केली. याप्रकरणी दोघांविरोधात जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT