young man died in accident
दुचाकी आणि मालवाहू वाहणाचा अपघात  Pudhari File Photo
सोलापूर

वेळापूर येथील अपघातात तरुणाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

मलोली : वेळापूर येथे शुक्रवारी (दि.28) दुचाकी आणि मालवाहू वाहणाचा अपघात झाल्याची घटना समोर आली. या अपघातात अरुणसिह फत्तेसिह जाधव या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने मलोली येथे शोककळा पसरली आहे.

मिळालेली माहिती अशी की, अरुणसिह फत्तेसिह जाधव हे मलोली येथून रात्री नऊ वाजता वेळापूर शहराच्या दिशेने आपल्या दुचाकीवर जात होते. वेळापूर शहराच्या दिशेने येणाऱ्या मालवाहू चालकाने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक झाली. या धडकेत अरुणसिंह जाधव यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने अधिक रक्तस्त्राव झाला होता. त्यांना पुढील उपचारासाठी अकलूज येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांच्या पश्चात आई भाऊ,पत्नी,दोन मुले असा परिवार असून त्यांच्यावर मलोली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाचे वृत समजताच वेळापूर व मलोली येथील नागरिकांनी दुःख व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घरी अलोट गर्दी केली होती.

SCROLL FOR NEXT