World Food Day 
सोलापूर

World Food Day : अन्नाची नासाडी टाळा अन भुकेल्या पोटांना आधार द्या!

अन्नाचा प्रत्येक कण वाचवण्याचे सामाजिक कार्यकर्त्यांकडून आवाहन

पुढारी वृत्तसेवा

​सोलापूर : एकीकडे लग्नसोहळे, पार्ट्या आणि हॉटेलमध्ये हजारो किलो अन्न कचऱ्याच्या पेटीत फेकले जाते, तर दुसरीकडे हजारो गरजू आणि गरिबांना एका वेळेच्या जेवणासाठी दिवसभर भटकंती करावी लागते. अन्नाची ही होणारी मोठी नासाडी रोखणे आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत अन्न पोहोचवणे, हाच जागतिक अन्न दिनाचा खरा संदेश आहे.

वाढती महागाई आणि बदलत्या निसर्गाच्या चक्रात अन्नधान्य पिकवणाऱ्या बळीराजाच्या कष्टाचा आदर करत नागरिकांनी अन्नाची नासाडी टाळावी, असे आवाहन सोलापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून केले जात आहे.

​दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी जगभरात जागतिक अन्न दिन साजरा केला जातो. उपाशी पोटी झोपणाऱ्या जगभरातील लाखो लोकांना अन्नाचे महत्त्व पटवून देणे आणि अन्नाची नासाडी थांबवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. शहर व जिल्ह्यातही विविध संस्थांच्या माध्यमातून या दिनानिमित्त विशेष जनजागृती उपक्रम आणि अन्नदानाचा संकल्प केला जात आहे.

हे संकल्प करण्याची गरज

​लग्नकार्यात, घरी जेवताना अन्नाची नासाडी होणार नाही, याची काळजी घ्या.

घरातील किंवा कार्यक्रमातील उरलेले उत्तम अन्न फेकून न देता अनाथ आश्रम किंवा गरजूंना पोहोचवा.

धान्याचा एक-एक कण शेतात पिकवण्यासाठी बळीराजाला अतोनात कष्ट करावे लागतात, याचे भान ठेवा.

घरातील अन्नधान्य खराब होणार नाही अशा प्रकारे त्याची योग्य साठवणूक करा.

​या संघटनेचे उपक्रम उत्‍कृष्ट

सोलापुरातील लोकमंगल, रोटरी क्‍लब, आस्‍था, रोटी बँक यासह अनेक सामाजिक संघटना रस्त्यावर, स्टेशनवर व झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गरिबांपर्यंत अन्न पोहोचवत आहेत. तसाच उपक्रम इतर सोलापूरकरांनी राबवावा, असा सूर नागरिकांतून उमटत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT