File Photo
सोलापूर

सोलापूर : तिसऱ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

कल्याण नगर येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : बांधकाम साइटवर काम करताना तिसऱ्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. २२) दुपारी कल्याण नगर येथे घडली. दीपक रतन चव्हाण (वय ४३, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

यात मिळालेली माहिती अशी की, कल्याण नगर येथील स्वर्ग हॉटेलच्या समोर नवीन अपार्टमेंटचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर दीपक चव्हाण हे मिस्त्री म्हणून काम करीत होते. बांधकामाच्या ठिकाणी मिस्त्री काम करणाऱ्या कामगारांना कोणतीही सुरक्षित साधने ठेकेदाराने दिली नाहीत. दरम्यान काम करत असताना तिसऱ्या मजल्यावरून पडून दीपक याचा मृत्यू झाला.

शहरातील अनेक बांधकाम साईडवर काम करीत असलेल्या कामगारांना ठेकेदार सुरक्षा पुरवित नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे तर अनेकांना गंभीर दुखापत होत आहे. बांधकाम साईडवरील कामगारांना सुविधा मिळत आहेत की नाही, याबाबत महापालिका तसेच राज्यशासनाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. दीपक चव्हाण यांना सुपरवायझर दाऊद पठाण यांनी बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेचे नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT