सोलापूर : दुचाकी दगडावर आदळून स्लीप झाल्याने पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी होऊन मरण पावली. पार्वती उमाकांत कोरे (वय ४६, रा. बीबीदारफळ, ता. उत्तर सोलापूर) या गुरुवारी (दि. ४) सकाळी दुचाकीवर डबल सीट बसून बीबीदारफळ येथून सोलापूरला येत होत्या.
केगाव येथील एमआयटी कॉलेजजवळ दुचाकी दगडावर आदळून स्लीप झाली. यामध्ये पार्वती यांच्या चेहऱ्यास जखम होऊन कानातून रक्त आले. त्यांना तातडीने उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारापूर्वी त्या मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.