Murder Case File Photo
सोलापूर

Solapur murder case: भावाच्या साथीने पत्नीकडून पतीचा खून

डोक्यात दगड घातला, सुरीने केला वार

पुढारी वृत्तसेवा

नातेपुते : पती बारामतीस राहायला येत नसल्याने चिडलेल्या पत्नीने आपल्या भावासह नवऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. तसेच त्याच्या डोक्यात दगड घालून सुरीने वार केले. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला. नातेपुते येथे दि. 14 रोजी रात्री 11 च्या सुमारास पर्वतेश्वर माळ नातेपुते (ता. माळशिरस) येथे ही घटना घडली. विजय डोंग्या भोसले (वय 35) खून झालेल्याचे नाव आहेत. तर पत्नी कांती विजय भोसले आणि यया बिऱ्या काळे (रा. बारामती) अशी संशयीतांची नावे आहे.

याबाबत माहिती अशी, कांती विजय भोसले व मेहुणा यया बिऱ्या काळे (रा. बारामती) यांनी विजयला बारामती येथे रहायला चल, असे सांगत भांडणे केले.यावेळी यया काळे याने विजय भोसले याच्या डोक्यात दगड घातला तर कांती भोसले हीने सुरीने पती विजय भोसले याच्या कानावर वार केले. या हल्ल्यात जखमी विजय भोसले याचा जागीच मृत्यू झाला. विजयचा मृत्यू झाल्यावर आरोपी पळून गेले.

या गुन्ह्याची माहीती पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पथक पाठविले. पोलीस निरिक्षक संजय जगताप, व नातेपुते पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कांती भोसले हिला जेरबंद केले. चौकशीत कांती भोसले हिने गुन्हाची कबुली दिली आहे. तर नातेपुते पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी विशाल वायकर यांनी पो.ना. राकेश लोहार, चा.पो.कॉ. संतोष वारे यांच्या पथकाने यया काळे याला रहीमतपूर (जि. सातारा) येथून 24 तासात अटक केली.

ही कामगिरी नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि विशाल वायकर,सोनल मोरे, सफौ. सतीश पाटकुलकर, देविदास धोत्रे, सफौ. रविंद्र गायकवाड, धनाजी शेळके, राकेश लोहार, सुरेश एकतपुरे, रणजित मदने, अस्लम शेख, सीमा सोनवणे, सायबर शाखेचे पोलीस अंमलदार प्रविण मेटकरी यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT