Talathi recruitment : तलाठीच्या 1700 जागांवर भरती प्रक्रिया कधी होणार ? Pudhari File Photo
सोलापूर

Talathi recruitment : तलाठीच्या 1700 जागांवर भरती प्रक्रिया कधी होणार ?

तीन वर्षांपासून राज्यात रखडली तलाठी भरती; सोलापूर जिल्ह्यातील 36 गावे रावसाहेबांच्या प्रतीक्षेत

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : राज्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून तलाठी पदांची भरती प्रक्रिया रखडली असून, तलाठी अर्थात ग्राम महसूल अधिकार्‍यांची तब्बल 1700 पदे आहेत. ही पदे लवकरच भरली जाणार असून त्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे. केवळ वित्त विभागाची मान्यता मिळताच ती भरली जाणार आहे. परंतु आदेश कधी निघणार याकडे लक्ष लागून आहे.

राज्यात 2023 साली तलाठी पदांसाठी मेगा भरती करण्यात आली. 4793 पदांची जाहिरात काढण्यात आली होती. त्यातील 4212 उमेदवारांनी राज्यभरात नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यापैकी 3850 उमेदवारांनी पदभारही स्वीकारला आहे. त्यामुळे जाहिरातीपैकी 942 ग्राम महसूल अधिकार्‍यांच्या जागा रिक्तच राहिल्या. तर त्याव्यतिरिक्तही 757पदे आता रिक्त आहेत. अशी सर्व मिळून1700 पदे रिक्त आहेत. लवकरच राज्य शासनाच्या वतीने आता प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या लेखी उत्तरात आ.दाते यांना कळविले आहेत.

परिणामी आता राज्यात 1700 ग्राम महसूल अधिकार्‍यांची पदे भरली जाणार असल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 2023 सालच्या ग्राम महसूल अधिकार्‍यांच्या पदभरतीच्या परीक्षा आयोजनातील गैरप्रकार आणि नियुक्ती वेळीही पैसा मुळे भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरली होती. तलाठीची भरती तीन वर्षांपासून रखडल्याने राज्यातील हजारो गावे ही अतिरिक्त तलाठी पदावरच सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांची कामे मोठ्या प्रमाणात रखडली आहेत. आता तरी तलाठी भरती करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

सोलापूर जिल्हातील 654 तलाठी पदे मंजूर आहेत. यापैकी 618 तलाठी कार्यरत आहेत. उर्वरित 36 पदे रिक्त आहेत. यापैकी काही तलाठी कामावर रुजू झाले तर काही जण रुजू झाल्यानंतर दुसरीकडे चांगली संधी मिळाल्यानंतर तलाठी पदाचा राजीनामा दिला आहे. 618 पैकी केवळ 20 तलाठ्यांकडेच स्वतंत्र कार्यालये आहेत. उर्वरित तलाठ्यांकडे कार्यालये नाहीत.
- प्रशांत शिरगुर, राज्य उपाध्यक्ष, पवित्र पोर्टल असो.
राज्यात अनेक गावात तलाठी उपलब्ध नाहीत एकाच तलाठीकडे अनेक गावांचा कारभारामुळे कामांचा ताण येतो. अनेक बैठका आणि इतर कामांमुळे रावसाहेबांना गावांना भेट देणे अवघड होत आहे.
- महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असो. महाराष्ट्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT