Solapur Well Collapse 2 Children Trapped Boramani News
सोलापूर: सोलापूरमधील बोरामणी गावात विहिरीचा दगडी कठडा कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. ढिगाऱ्या दोन मुले अडकली असून बचावकार्य सुरू असल्याचे प्रशासनसाने सांगितले. आणखी तीन जण ढिगाऱ्याखाली अडकले होते, मात्र त्यांची पथकाने सुखरुप सुटका केली.
गुरुवारी दुपारी बोरामणी गावातील जवळपास ५ ते ६ मुले एका शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेली होती. त्यावेळी अचानक दगडी विहीर ढासळल्याने ही सर्व मुले या विहिरीत अडकली. ग्रामस्थांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तिघांना विहिरीतून बाहेर काढले. मात्र, दोन मुले अद्याप ही विहिरीतच अडकली आहेत. दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांकडून या मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
निकालाचा उत्साह काही क्षणातच...
१ मे महाराष्ट्र दिनी शाळेत निकाल होता. परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर गावातील काही विद्यार्थी नदीवर पोहायला गेले. उन्हाळ्यामुळे अंगाची लाही लाही होत असताना विहिरीत पोहायला जाण्यासाठी निकालाचं निमित्तही चांगलं होतं. पण या उत्साहाला दुर्घटनेमुळे गालबोट लागले. बोरामणीतील दत्ता शेळके यांच्या विहिरीत ही मुलं पोहायला उतरली. मात्र, काही वेळातच विहिरीचा दगडी कठडा कोसळला. यात पाच विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले. त्यापैकी तीन जणांना ढिगाऱ्याातून बाहेर काढण्यात आले.