माढा : आष्टी योजनेतून मोडनिंबसाठी सोडलेल्या पाण्याचे पूजन करताना मान्यवर. Pudhari Photo
सोलापूर

‘आष्टी’तून मोडनिंबला प्रथमच पाणी

आ. अभिजित पाटलांच्या प्रयत्नांना यश; शेतकरी आनंदात

पुढारी वृत्तसेवा

माढा : माढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांच्याकडे मोडनिंब शहरातील अनेक ग्रामस्थांनी मागणी केली असता गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मोडनिंब शहराला पाणी प्रश्नाला अखेर न्याय मिळाला असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. आष्टी उपसा सिंचन योजनेतून पहिल्यांदाच मोडनिंब शहराला पाणी मिळाले आहे.

मोडनिंब शहर आणि परिसरातील नागरिकांची पाण्यासाठीची प्रतीक्षा अखेर संपली असून आमदार अभिजित पाटील यांच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांशी सातत्याने चर्चा आणि पाठपुरावा केल्यानंतर आष्टी उपसा सिंचन योजनेतून डाव्या कालव्यातून पहिल्यांदाच पाणी सोडण्यात आले. या ऐतिहासिक क्षणी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, आनंद पाटील, डॉ. सागर गिड्डे, बाळासाहेब पाटील, बालाजी पाटील, शिवाजीराजे सुर्वे, दीपक सुर्वे, गौतम ओहोळ, गोटु शिंदे, विजयसिंह गिड्डे, संतोष मुटकुळे, संभाजी काळे, अख्तर तांबोळी, आकाश कोळी, संभाजी लादे, नंदकुमार लादे, प्रकाश कोळी, संचालक संदीप खारे, सचिन वाघाटे यांनी जलपूजन करून आनंद व्यक्त करत आमदार पाटील यांचे आभार मानले. मोडनिंबसाठी हा विकासाचा महत्त्वाचा टप्पा असून, भविष्यात आणखी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे, असे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT