सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा
धर्म म्हणजे कर्तव्य, देशात आपण टिकले पाहिजे याकरिता आपले कर्तव्य म्हणून धर्माच्या कामासाठी हिंदूबांधव जर यात गाफिल राहिले, तर बांगलादेशात हिंदूंवर जे अत्याचार घडत आहेत ते आपल्या घरापर्यंत यायला उशीर लागणार नाही. सर्वांनी स्वास्थ्य, सुरक्षितता व शांतता निर्माण होण्याकरिता पहिले धर्म म्हणून काम केले पाहिजे. हिंदूंच्या विचारांचे लोकप्रतिनिधी निवडून येण्याकरिता सर्वांनी 100 टक्के मतदान करण्याचे आवाहन प. पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी केले.
विश्व हिंदू परिषदेच्या षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त सोलापुरात धर्माचार्य चिंतन संमेलन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, राचोटेश्वर महास्वामी, शिवलिंगेश्वर महास्वामी, लक्ष्मण चव्हाण महाराज, सुधाकर इंगळे महाराज, मारुती तुणतुणे महाराज, संजय मुद्राळे, किशोर चव्हाण, अभिमन्यू डोंगरे, नागनाथ बोंगरगे, शिवाजी मोरे, भागवत महाराज चवरे, रमेश सिंग, पंकज शर्मा, हेमंत हरहरे, अविनाश सज्जन उपस्थित होते. श्रीकंंठ शिवाचार्य महास्वामी यांनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन संजयकुमार जमादार यांनी केले. परिचय विजयकुमार पिसे यांनी करून दिला.
हिंदू समाजाच्या पुनरूत्थानासाठी पंचपरिवर्तन समरसता, पर्यावरण, कुटुंबप्रबोधन, नागरी शिष्टाचार, स्वदेशी भाव हे नमूद करुन सर्व जगात हिंदू धर्मच श्रेष्ठ आहे, असे काशी जगद्गुरू यांनी आशीर्वचनातून सांगितले.