Pandharpur Vitthal Rukmini Temple Pudhari
सोलापूर

Vitthal Rukmini Temple: श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास भाविकांकडून अधिक मासात ९ कोटी ४६ लाखांचे दान

दर्शनासाठी १४ लाख ६० हजार ६८८ भाविकांनी हजेरी

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : अधिक मास कालावधीत तब्बल १४ लाख ६० हजार ६८८ भाविकांनी पंढरपुरात हजेरी लावत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या पदस्पर्श व मुखदर्शनाचा लाभ घेतला. यावेळी भाविकांनी श्रद्धेने रोख देणगी तसेच सोने-चांदीचे दागिने अर्पण केले. या काळात विविध माध्यमांतून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीस ९ कोटी ४६ लाख २८ हजार २३३ रुपये उत्पन्‍न प्राप्त झाल्याची माहिती समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

दि. १७ मे ते १५ जून या अधिक मास कालावधीत भाविकांकडून ‘श्रीं’च्या चरणी रु. ८१ लाख ७२ हजार ६७९ अर्पण करण्यात आले. याशिवाय देणगीद्वारे रु. २ कोटी ३ लाख ५५ हजार १८०, लाडू प्रसाद विक्रीतून रु. ७२ लाख ३३ हजार ७००, भक्तनिवासातून रु. १ कोटी २५ लाख ५६,७२३, पूजाविधीमधून रु. ११ लाख ३ हजार ४२७, हुंडीपेटीतून रु. २ कोटी ५३ लाख ८२ हजार ३४४, सोने-चांदी अर्पणातून रु. १ कोटी ७८ लाख ४३ हजार १६७, तसेच फोटो विक्री, महावस्त्रे, शेणखत, गोमूत्र, मोबाईल लॉकर, जमा पावती, चंदन आदी विविध माध्यमांतून रु. १९ लाख ८१ हजार १३ इतके उत्पन्‍न प्राप्त झाले.

तुलनात्मकदृष्ट्या, सन २०२३ च्या अधिकमासात ‘श्रीं’च्या चरणी रु. ७३,९५,३५३, देणगी रु. १,५२,९०,३३५, लाडू प्रसाद विक्री रु. ८७,७३,३००, भक्तनिवास रु. १,००,५०,००९, पूजाविधी रु. २८,०५,७४१, हुंडीपेटी रु. २,२५,७०,४९१, सोने-चांदी अर्पण रु. ३३,१७,७४९ आणि इतर विविध माध्यमांतून रु. १७,३९,४५९ इतके उत्पन्‍न प्राप्त झाले होते.

अधिक मासात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी गर्दी होते. यंदाच्या अधिक मासात ५,३०,६२० भाविकांनी पदस्पर्श दर्शन, तर सुमारे ९,३०,०६८ भाविकांनी मुखदर्शनाचा लाभ घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT