Pandharpur Vitthal Temple  Pudhari Photo
सोलापूर

Pandharpur Vitthal Rukmini Temple: पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचे व्हीआयपी, टोकन दर्शन बंद

मकर संक्रांतीच्या गर्दीवर मंदिर समितीचा उपाय

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : मकर संक्रांतीनिमित्त तीर्थथक्षेत्र पंढरपूरच्या श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन आणि टोकन दर्शन बुकिंग व्यवस्था बंद ठेवण्यात येणार आहे. याबरोबरच दैनंदिन विविध पूजांची संख्याही कमी करून भाविकांना दर्शनासाठी जास्तीत जास्त वेळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

मकर संक्रांतीच्या कालावधीत भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन, दर्शनरांग व्यवस्थापन, कमांडोज नियुक्ती, चांगली स्वच्छता व्यवस्था, भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे प्र. व्यवस्थापक संदेश भोसले यांनी कळविले.

मंदिरात प्रतिवर्षी प्रमाणे परंपरेनुसार मकरसंक्रांत उत्सव साजरा करण्यात येत आहे. मकरसंक्रांतीच्या उत्सवानिमित्त भोगीला म्हणजे दिनांक 13 जानेवारी रोजी रूक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा पहाटे तीन ते साडेचार या वेळेत करण्यात येणार असून, माता व भगिनींना श्री रूक्मिणी मातेस भोगी करावयाची असेल, त्यांनी मंदिरामध्ये पहाटे साडेचार ते साडेपाच या वेळेत करावी. त्यादिवशी पहाटे साडेपाच नंतर श्री रूक्मिणी मातेस पोषाख व अलंकार परिधान करण्यात येतील व सकाळी साडेसहा वाजेपर्यंत दर्शन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT