सोलापूर ः वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथे स्वातंत्र्यपूर्व काळात मागासवर्गीयांनी बांधलेल्या ऐतिहासिक विहिरीचे सुशोभीकरण सुरु आहे. या विहिरीवर तब्बल 18 हजार 300 किलो सळईचा वापर करीत स्तूप बांधले आहे. हे लकवरच पूर्ण केले जाणार आहे. यामुळे ऐतिहासिक विहीर उजळून निघणार आहे.
वळसंग येथे 1937 मध्ये भीमसैनिकांनी स्वतःच्या वस्तीच्या पाणीपुरवठ्यासाठी श्रमदानाने व स्वखर्चाने विहीर खणली होती. जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विहिरीतील पाणी पीत नाहीत, पाण्याला स्पर्श करीत नाहीत तोपर्यंत पाणी प्यायचे नाही, असा संकल्प येथील समाज बांधवांनी केला होता. येथील भीमसैनिकांच्या भावना लक्षात घेऊन 1937 मध्ये डॉ. आंबेडकर सोलापूर दौर्यावर आले होते. यावेळी त्यांनी वळसंग येथील चिरेबंद बांधकाम असलेल्या ऐतिहासिक विहिरीचे उद्घाटन केले होते. त्या घटनेस 88 वर्षे पूर्ण झाली आहेत. तेव्हा गावातील प्रमुख रस्त्यावरून त्यांची स्वातंत्र्य सैनिक स्व. गुरुसिद्धप्पा अंटद यांनी त्यांच्या बैलगाडीमध्ये बसवून वाजतगाजत कार्यक्रमस्थळी आणले होते. तदनंतर मात्र स्व. सैनिक अंटद परिवारावर बहिष्कार टाकला. वळसंग येथील सध्या विद्यमान सरपंच जगदीश अंटद हे त्यांचे नातू आहेत. हा योगायोग आहे.
ग्रामपंचायतकडून या ऐतिहासिक कामास सहकार्य मिळत आहे. 24 एप्रिल 1937 रोजी डॉ. आंबेडकर यांनी पाणी स्वतः प्राशन केले. तेव्हापासून आजतागायत येथील लोक याच विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरतात. या ऐतिहासिक स्थळाचे जतन व्हावे यासाठी या विहिरीवर बौद्ध स्तूप उभारण्यात आले आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी 2023-24 मध्ये एक कोटी रुपये मंजूर केले. 2025-26 मध्ये दोन कोटी मंजूर केले तर 24-25 मध्ये 28 लाख रुपये मंजूर केले. यातून विहीरच्या विकासाचे काम सुरु आहे.
वळसंग येथील ऐतिहासिक विहिरीवर बांधण्यात येणारे बौद्ध स्तूप हे भूकंपरोधक आहे. या कामासाठी एकूण 18 हजार 300 किलो सळईचा वापर केला आहे. तांत्रिकदृष्ट्या व गुणवत्तापूर्ण स्तूप बांधले आहे.
वळसंग येथील ऐतिहासिक विहीर आरसीसी स्तूपचे हे माझ्या स्वप्नवत नाविनपूर्ण संकल्पनेतून उभारण्यात येत आहे. सध्या हे काम प्रगतीपथावर आहे. याचा मला अभिमान वाटतो.राजेश जगताप, शाखा अभियंता, जिल्हा परिषद