आमदार उत्तम जानकर Pudhari File Photo
सोलापूर

Uttam Jankar | बिर्याणीमध्ये गुळवणी चालेल का? : जानकर

दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणावर सवाल

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायच्या असतील, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल. बिर्याणीमध्ये गुळवणी चालेल का, असा सवाल उपस्थित करीत माळशिरस येथील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. उत्तम जानकर यांनी एकत्रिकरण सध्यातरी शक्य नसल्याचे संकेत दिले आहेत.

आ. उत्तम जानकर हे नेहमी बेधडक विधाने करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलनीकरणाबाबत त्यांनी वक्तव्य करुन राज्यात चर्चेला तोंड फोडले आहे. अस्सल गावरान भाषेत बोलताना आ. जानकर यांनी बिर्याणीमध्ये गुळवणी चालेला का असा प्रतिप्रश्न उपस्थितांना करीत दोन्ही राष्ट्रवादी सध्यातरी एकत्र येऊ शकत नसल्याचे संकेत दिले. सोलापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणूका लढवत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आ. जानकर यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. उद्या काय घडेल हे माहित नसले तरी, सध्या आपण शरद पवारांचा विचार घेऊनच पुढे जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

..तर अजितदादांनी सत्तेतून बाहेर पडावे

खा. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र येतील असे वाटत नाही. दोघांचे विचार आता वेगळे झाले आहेत. अजितदादा सध्या सत्तेसोबत आहेत आणि शरद पवारांचे विचार वेगळे आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायच्या असतील तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रथम सत्तेतून बाहेर पडावे लागेल असे आ. जानकर म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT