मंगळवेढा : येथे सर्व्हिस रोडवर असलेले अंडरग्राऊंड गटारीवरील स्लॅबचे काम सुरू करण्यात आल्याचे दिसत आहे. Pudhari Photo
सोलापूर

Solapur News : सर्व्हिस रोडवरील भूमिगत गटारीच्या स्लॅबचे काम सुरू

दै.‘पुढारी’च्या वृत्ताने महामार्ग प्रशासन खडबडून जागे; महामार्ग प्राधिकरण तत्काळ कार्यरत

पुढारी वृत्तसेवा

मंगळवेढा : मंगळवेढा शहरातून जाणार्‍या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूरकडे जाणार्‍या छत्रपती संभाजीराजे चौकातील उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडवर असलेले अंडरग्राऊंड गटारीवरील स्लॅब सध्या धोकादायक अवस्थेत आहे. अशा आशयाची बातमी गुरुवारी दैनिक ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झाली आणि महामार्ग प्राधिकरण तत्काळ कार्यरत झाले. गुरुवारी सकाळी त्या स्लॅबच्या कामाची सुरुवात झाली आहे.

दोन वर्षांपूर्वी मंगळवेढ्यातून सोलापूरकडे जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग विकसित करण्यात आला आहे. मात्र, घाईगडबडीत सदर काम पूर्ण झाले. त्यामुळे या महामार्गावर अनेक त्रुटी दिसतात. काही ठिकाणी काम व्यवस्थित न झाल्याने लगेचच गुणवत्ता ढासळली असल्याचे दिसून आले. यातच सर्व्हिस रोडवरून अतिशय जड वाहने, टू व्हीलर, फोर व्हीलर, एसटी, सोलापूरला जाते. सोलापूरकडून मंगळवेढ्याला येते. धोकादायक स्लॅब हा नेमका उड्डाणपुलाखालील वळणातच आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, हे वृत्त प्रसिध्द झाले. यानंतर प्रशासन कामाला लागले आहे. दैनिक ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल घेत काम सुरू झाल्याबद्दल शहरातील नागरिकांकडून दै. ‘पुढारी’चे आभार मानण्यात आले.

प्रशासनाने गांभीर्य ओळखून त्वरित कार्यवाही केल्याबद्दल अभिनंदन, मात्र इतर प्रश्न महामार्ग अधिकार्‍यांनी त्याच तत्परतेने मार्गी लावले पाहिजेत, हा प्रश्न गंभीर होता. दै.‘पुढारी’ ने त्याला माध्यमातून न्याय दिला. याबद्दल दै. ‘पुढारी’ नेहमी सर्वसामान्याच्या सार्वजनिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत आहे.
-प्रफुल्ल सोमदळे, सामाजिक कार्यकर्ता, मंगळवेढा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT