सोलापूर : माळशिरस तालुक्यातील उंबरे दहिगाव येथे झालेल्या चोरीच्या प्रकरणाचा शोध सुरू असताना पोलिसांच्या जाळ्यात तीन अट्टल चोरटे सापडले. या टोळीने तब्बल दहा गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे या टोळीने अकलूज मधील ज्याच्याकडे सोने विक्री केली, त्यासही सहआरोपी बनवून अटक करण्यात आली.
मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात उंबरे दहिगार गावातील वाघमोडे वस्ती येथील चार घरांत घरफोडी झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार रोहीत दीपक पवार (वय 25, रा. पद्मावती नगर, अकलूज ) यास अटक केली. त्याचा साथीदार भोलेनाथ उर्फ शन्या चंद्रकांत भोसले (रा. चाकोरे अकलूज) , भैय्या शकील शेख (रा. वेळापूर) याच्यासोबत केल्याची कबुली त्याने दिली. तसेच चोरीचे इतर दहा गुन्हे केल्याची कबुली दिली.
यानुसार माळशिरस मध्ये सहा तर वेळापूर मधील तीन तर अकलूज मधील एका गुन्हाचा समावेश आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पा पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील, पोलीस हवालदार सली बागवान, विजयकुमार भरले, पो. कॉ. सागर ढोरे पाटील, प्रमोद शिंपाळे, यश देवकते, समर्थ गाजरे, योगेश जाधव, दिलीप थोरात, व्यंकटेश मोरे यांनी बजावली.