पंढरपूर : उजनी धरण 76 टक्के भरले आहे. धरण परिसरात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन आषाढी यात्रा काळात पूरस्थिती उद्भवू नये म्हणून प्रशासनाने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून आतापासुनच धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. सद्या भीमा नदीपात्रात 26600 क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी पंढरपूर येथे दाखल झाले आहे. या पाण्याने चंद्रभागा वाळवंटातील पुंडलिक मंदिरास इतर मंदिरांना वेढा दिला आहे.
चालू वर्षी पाऊस लवकरच पडला आहे. त्यामुळे उजनी धरण 76 टक्के भरले आहे. धरण क्षेत्रातुनही धरणात 50 हजाराचा विसर्ग येत आहे. उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आषाढी यात्रा काळात पूरस्थिती उद्भवू नये म्हणून प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे.पाण्याची पातळी पंढरपूर येथे कमी ठेवण्यात येणार आहे. आषाढी यात्रेच्या काळात पुरस्थिती उद्भवू नये. म्हणून पाण्याचे व्यवस्थापन अगोदरच करण्यात येत आहे. जर वारीच्या काळात पाऊस पडला तर उजनी धरणात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असली पाहिजे, अशी व्यवस्था करण्यात येत आहे.
तसेच वीर धरणातूनही पाणी सोडण्यात येत आहे. तशा सूचना देण्यात आलेल्या आहे. या धरणातून दोन हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. दरम्यान, धरणातून सोडण्यात आलेले पाणी पंढरपूर येथे दाखल झाले आहे. या पाण्याने चंद्रभागा पाण्याखाली गेले आहे, तर वाळवंटातील मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे.
उजनी धरण क्षेत्रात जादा पाऊस झाला तर आषाढी यात्रा काळात पूरस्थिती उद्भवू नये, म्हणून आतापासूनच पाण्याचा विसर्ग सुरू करून पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. धरणातून एकदम पाणी कमी केले जाणार नाही. दि. 28 व 29 जूनपर्यंत विसर्ग असणार आहे. यानंतर केवळ दोन हजार क्यूसेकचा विसर्ग असणार आहे. त्यामुळे वारी काळात भाविकांना स्नान करण्यासाठी पाणी उपलब्ध असेल.- ना. जयकुमार गोरे, पालकमंत्री