Ujani Dam 
सोलापूर

Ujani Dam : उजनी धरणातून भीमा नदीत ४५०० क्युसेकने विसर्ग

उजनी धरणाच्या सांडव्यामधून (स्पिलवे) आज शनिवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग वाढवून २९०० क्युसेक करण्यात आला

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : उजनी धरणाच्या सांडव्यामधून (स्पिलवे) आज शनिवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग वाढवून २९०० क्युसेक करण्यात आला. पॉवर हाऊसमधून सुरू असलेल्या १६०० क्युसेक विसर्गासह भीमा नदीपात्रात आता एकूण ४५०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

भीमा नदीच्या पाणीप्रवाहात वाढ झाली आहे. सध्या अल निनोमुळे सोलापूर यंदा सरासरीच्या केवळ पन्नास टक्‍केच पाऊस पडल्याने त्याचा फटका पाणी टंचाईवर निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भीमा नदीपात्र पूर्ण कोरडे पडले आहे.

मंगळवेढा, पंढरपूर, सांगोलासह भीमा नदीकाठच्या गावांची तहान भीमा नदीतील पाण्यातूनच भागविली जाते. नदी कोरडी असल्याने पाणी सोडण्याची मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर हे पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर बंधाऱ्याजवळ पोहोचेपर्यंत सोडले जाणार आहे. हिळ्ळीपर्यंत भीमा नदीपात्र कोरडे असल्याने या बंधाऱ्यापर्यंत उजनीचे पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन

भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. नदीपात्रात जाणे, पोहण्यासाठी उतरणे, जनावरे पाण्यात नेणे किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ थांबणे टाळावे. नदीकाठच्या शेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांनीही परिस्थितीवर लक्ष ठेवावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT