सोलापूर : उजनी आणि वीर धरणाच्या माथ्यावर पाऊस कमी झाल्याने नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गात कमी करण्यात आल्याने पुराचा संकट टळला आहे. गेल्या तीन दिवसांपासून भीमा नदी ही इशारा पातळीवरून वाहत होते. उजनी धरणातून 7166 क्युसेक तर वीर धरणातून निरा नदीत 33 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुुरु होता. पाऊस कमी झाल्याने विसर्गात घट करण्यात आला आहे.
मंगळवारी दि. 29 जुलै रोजी रात्री 6100 क्युसेक इतका विसर्ग उजनीतून भीमा नदी पात्रात सोडण्यात आला होता. त्यात बुधवारी दि. 30 जुलै रोजी दुपारी 1 वाजता त्यात विसर्ग कमी करून 5100 क्युसेक इतका ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे वीर धरणातून निरा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्गात कमी कमी करत 13 हजार 973 क्युसेक इतका करण्यात आला आहे. त्यामुळे आता भीमा नदी ही 65 हजार 73 हजार क्युसेकने वाहणार आहे.
मंगळवारी आणि बुधवारी या दोन्ही दिवशी एक लाख क्युसेकने भीमा नदी वाहत असल्याने त्याचा चंद्रभागा नदीत पात्रातील मंदिरे पाण्याने वेढले होते. नदीकाठ सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. आता पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने नदीकाठच्या लोकांना दिलासा मिळाला आहे.
180 क्युसेक तर दहिगांव उपसा सिंचन योजनेसाठी उजनीतून 80 क्युसेक तर मुख्य कालव्यातून 100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.