Two cases of fraud in Solapur
सोलापुरात फसवणुकीच्या दोन घटना Pudhari File Photo
सोलापूर

सोलापूर : दोन घटनांमध्ये 57 लाखांची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून नोकरीची गरज असलेल्या सोलापुरातील 60 जणांची 36 लाखांची फसवणूक झाली आहे. दुसर्‍या घटनेमध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्याचे आमिष दाखवून 21 लाखांची फसवणूक झाली आहे. अशाप्रकारे सोलापुरात फसवणुकीच्या दोन घटनांमध्ये 57 लाखांची फसवणूक झाली आहे.

परदेशात नोकरी लावण्याचे आमिष केली फसवणूक

नोकरी लावण्याच्या प्रकाराबाबत सिराज अब्दुल रशीद नदाफ (वय 40, रा. 46/29, उत्तर सदर बाझार, विद्यानगर जवळ) यांनी सदर बाझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सय्यद मसूद ऊर्फ असद गझानफरदअली (रा. 150 कोंडानगर), सय्यद नवेद हुसेन (वय 31, रा. 31 मकदूमिया बिल्डिंग, पहिला मजला, माहिददर्गा समोर माहीम, मुंबई), सय्यद गझानफरअली खतीब (रा. कोंडानगर, सोलापूर), रहीस अहमद एलाहीबक्ष (रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर सदर बझार, विद्यानगर येथे 1 सप्टेंबर 2022 ते 21 डिसेंबर 2022 दरम्यान यातील संशयितआरोपींनी डायनॅमिक कन्सल्टंन्सी अँड मॅन पॉवर सर्व्हिसेस या नावाचे शॉप नंबर 30 पहिला मजला, आर. एन. गोली सेलिब्रेशन, अशोक चौक येथे सुरु केले. येथे फिर्यादीस खोटी माहिती देऊन कन्सल्टंट म्हणून नोकरीस ठेवून परदेशात नोकरीची उत्तम संधी असल्याचे पॅम्पलेट छापले. त्यावर फिर्यादीचा मोबाईल नंबर छापला. नोकरीची गरज असलेल्या 60 जणांकडून 36 लाख रुपये फोन पे, गुगल पे, बँकेद्वारे व रोख रक्कम स्वरूपात घेऊन 18 लोकांना बनावट व्हीजा, ऑफर लेटर ही कागदपत्रे बोगस तयार करून देऊन लोकांची फसवणूक केली आहे. पैसे परत मागितले असता यातील संशयित आरोपी रहीस अहमद इलाहीबक्ष दलाल याने शिवीगाळ करून हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनी अहिवळे करीत आहेत.

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्याचे आमिष; 21 लाखांची फसवणूक

दुसर्‍या घटनेत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे अमिष दाखवून 21 लाखांची फसवणूक केली आहे. याबाबत याबाबत दिलीप राजेंद्र रंगरेज (वय 49, रा. दाजी पेठ, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून गणेश आनंद काळे उर्फ टकले (रा. निलम नगर, सोलापूर) यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीस शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले. त्या बदल्यात चांगला मोबदला मिळेल. ठेवलेल्या रकमेचे दामदुप्पट होईल, असे अमिष दाखवून 20 लाख 96 हजार 500 रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना तीन ऑगस्ट 2022 ते 12 ऑगस्ट 2023 पर्यंत दाजी पेठ, सोलापूर येथे घडली.

SCROLL FOR NEXT