सोलापूर : तस्करीसाठी सोलापूर येथून आंतरराज्यीय टोळीने चोरलेली कार राजस्थानच्या सीमेवरून जप्त करण्यात विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाला यश आले. याप्रकरणी संशयित आरोपी रमेशकुमार प्रभूराम बिश्नोई (वय 25, रा. मासोई की ढाणी सिया ता. सांचौर, जि. जालौर) व रूपाराम मनाराम बिश्नोई (वय 32, रा. पुनासा, ता. भिनमाल, जि. जालौर) यांना अटक करण्यात आली.
अण्णाराव म्हेत्रे (रा. संत तुकाराम नगर, विजापूर रोड) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात चारचाकी चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती. सोलापूर ते राजस्थान दरम्यान सुमारे 135 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. राजस्थानच्या सीमेवर पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले.