Fake currency  pudhari photo
सोलापूर

fake currency case: झेरॉक्स काढून बनावट नोटा तयार करणारे दोघे ताब्यात

दोघेही पंढरपूर तालुक्यातील, तीन दिवसांची कोठडी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : नोटांचे झेरॉक्स काढून त्या खऱ्या असल्याचे भासवून बाजारात चालविण्याऱ्या दोघांना जेलरोड पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघेही पंढरपूर तालुक्यातील रहिवासी असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली.

अक्कलकोट रोडवरील हिंदू स्मशानभूमीजवळ दोघे कमी रकमेच्या बदल्यात जादा बनावट नोटा विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती जेलरोडे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. राजू विश्वनाथ चोरमुले (रा. पंढरपूर ) आणि अतुल भागवत तावरे ( रा. करकंब, ता. पंढरपूर) अशी अटक केलेल्या दोघा संशयीत आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 500 दराच्या एक लाख 10 हजार 500 रुपयांच्या नोटा जप्त केल्या.

या नोटा त्यांनी झेरॉक्स काढून खऱ्या नोटांसारख्या बनवल्या होत्या. कमी किंमतीत जादा नोटा देण्याचे आमीष ते दाखवत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. दोघांना अटक करुन न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास सहा. पोलिस निरीक्षक संदिप पाटील करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT