सोलापूर : बहुप्रतिक्षित सोलापूर-गोवा विमानसेवा 26 मे पासून सुरु करणार आहोत, त्याबाबतच्या वेळापत्रकचे मेल जिल्हा प्रशासनाला फ्लाय 91 कंपनीने पाठविले आहे, आठवड्यातून सोमवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस विमानसेवा सुरु राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दिली.
सोलापूरहून-मुंबईला विमानसेवा सुरु व्हावी, याबाबत प्रचंड मागणी आहे. परंतू फ्लाय 91 कंपनी प्रारंभी गोव्याला विमानसेवा सुरु करण्यास इच्छुक आहे. त्यांच्या 72 सिटर विमानसेवेला डिजीसीआय कंपनीने मंजुरी दिली आहे. प्रारंभी आठवड्यातून दोनदा म्हणजे प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी विमान गोव्यासाठी सोलापुरातून टेकऑफ होणार आहे. या दोन्ही दिवशी सकाळी 8.50 वाजता सोलापुरातून गोव्याकडे जातील. तर सकाळी 7.20 वाजता गोव्यातून सोलापुरकडे प्रयाण करतील अशी माहिती विमानसेवा कंपनीने दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
स्टार विमानसेवा कंपनीला विमान सेवा सुरु करण्यासाठी 3 एसी विमानतळ लागते. परंतु, ती सुविधा सोलापुरच्या होटगी रोडवरील विमानतळावर नाही. त्यामुळे स्टार विमानसेवा कंपनी यातून माघारी घेण्याची तयारी दर्शविली आहे. होटगी रोड विमानतळ ही 2 एसी दर्जाचे आहेत. फ्लाय 91 ही विमानसेवा कंपनी येत्या जून अखेरपर्यंत विमानसेवा सुरु करतील असेही जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी सांगितले.