Tulja Bhavani Temple 
सोलापूर

Tulja Bhavani Temple : रथसप्तमीनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनाला गर्दी; प्रशासनाची पेड पासबंदी

रथसप्तमीच्या निमित्ताने तुळजाभवानी देवीची रथ अलंकार महापूजा

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर ः रथसप्तमीच्या निमित्ताने तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी शनिवार आणि रविवारी खूप मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून आली. सलग सुट्ट्या आणि रथसप्तमीचा उत्सव यामुळे गर्दी वाढल्याचे सांगण्यात आले.

रथसप्तमीच्या निमित्ताने तुळजाभवानी देवीला रथ अलंकार महापूजा करण्यात आली, शारदीय नवरात्र व शाकांबरी नवरात्र या काळात ज्या महापूजा होतात त्यामधील ही रथ अलंकार महापूजा आहे. परंपरागत पद्धतीने रथसप्तमीच्या निमित्ताने ही पूजा देवीस केली जाते. तुळजाभवानी देवी रथामध्ये बसून रथाचे सारथ्य करीत आहे, असा हा नयन मनोहर देखावा दिवसभर भाविकांना पहावयास मिळाला.गर्दीचा अंदाज घेऊन तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने दोनशे रुपयांचे पेड दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सोमवारी 26 जानेवारी असल्यामुळे तत्पूर्वी शनिवार आणि रविवार रथसप्तमीचा दिवस अशा विविध कारणांनी खूप मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी तुळजापुरात वाढली. स्थानिक पातळीवर असणारे सर्व लॉजिंगदेखील यामुळे हाऊसफुलच्या स्थितीत दिसून आले. शहरामध्ये सर्वत्र गर्दी दिसून आली. सर्व वाहन तळे आणि रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचीदेखील गर्दी झाली होती. मंदिर परिसरातील गर्दीवर पोलिसांकडून नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

वाहन चालक, भाविकांची नाराजी

गर्दीच्या वेळी पोलिस प्रशासनाकडून बाहेरून आलेल्या भाविकांना विशेषतः चारचाकी वाहनचालकांना सहकार्य होत नाही, अशी तक्रार पुणे, सांगली, सातारा येथील भाविकांनी बोलून दाखवली. एका बाजूला पार्किंगची अपुरी व्यवस्था असताना दुसरा बाजूला टॅक्स वसुली मात्र शक्तीने केली जाते, हे नको आहे. आम्ही तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरला नेहमी येतो; परंतु नेहमी होणार हा त्रास राज्य शासनाने थांबवला पाहिजे, अशी मागणीदेखील श्रीकांत सरदेशमुख या पुणे येथील भाविकांनी व्यक्त केली. राज्य शासन एका बाजूला यात्रा अनुदान आणि विविध सवलती देत असताना दुसऱ्या बाजूला भाविकांना सक्तीचा वाहन प्रवेशाचा कर लावणे अत्यंत चुकीचे आहे. या निर्णयाबाबत फेरविचार करावा, अशी सूचना भाविकांनी मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT