सोलापूर

Tuljapur Temple development|'मंदिराचे मूळ प्राचीन रूप कायम राहावे, पुरातत्व खात्याचा अहवाल पुजारी मंडळाला देण्यात यावा'

Tuljapur Temple development|'मंदिराचे मूळ प्राचीन रूप कायम राहावे, पुरातत्व खात्याचा अहवाल पुजारी मंडळाला देण्यात यावा'

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : डॉ. सतीश महामुनी

छत्रपती शिवाजी महाराज यांना तुळजाभवानी देवी भवानी तलवार देत आहे, हा १०८ फूटी पुतळा मंदिराच्या पूर्वेच्या बाजूस करण्यात यावा व पश्चिम दिशा आरादवाडी या भागात करण्यात येऊ नये, अशी मागणी पुजारी मंडळ प्रतिनिधी आणि पुजारी प्रतिनिधींनी केली आहे.

पुरातत्व खात्याने दिलेला अहवाल पुजारी मंडळाला देण्यात यावा, आय. आय. टी. मद्रास, सी. एस. आय. आर., सी . आय. आर. अशा राष्ट्रीय परीक्षण संस्थेकडून पुन्हा परीक्षण करावे, आजचे मंदिराची स्थिती भिंतीला गेलेले तडे याचा सूक्ष्म अभ्यास करून मंदिर आहे त्या स्थितीत ठेवून बाजूचा विकास करावा, मंदिराला असणारा धोका निश्चित करावा, मंदिराचे प्राचीन बांधकाम कायम ठेवावे, या निर्णय प्रक्रियेमध्ये जागेचे हक्कदार आणि पुजारी मंडळाचे प्रतिनिधी यांना सविस्तर माहिती द्यावी अशा विविध मागण्यासाठी २७ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.

या उपोषणाच्या अनुषंगाने तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांना निवेदन देण्यात आले आहे.

तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास तीर्थक्षेत्र म्हणून करण्याची आवश्यकता आ.हे या तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न करू नये अशी मागणी देखील या पुजारी मंडळाच्या प्रतिनिधींनी या उपोषणाद्वारे उपस्थित केली आहे. भाविक भक्ताचा गुणधर्म कुलाचार आणि धार्मिक परंपरा याच्याशी संबंधित विकास करावा. भाविक भक्ताला केंद्रबिंदू समजून सर्व धार्मिक विधी व्यवस्थित होण्यासाठी भाविकांची सुविधा आणि पुजाऱ्यांची सुविधा अबाधित ठेवण्यात यावी. मंदिराचे सरकारीकरण करू नये याला मंदिर येथे असणारे धार्मिक विधी परंपरागत हक्क अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने आराखडा करावा, यासाठी तीनही पुजारी मंडळाला सविस्तर विश्वासात घ्यावे, अशी मागणी पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे कदम, पुजारी मंडळाध्यक्ष विपीन शिंदे व उपाध्ये मंडळ अध्यक्ष अनंत कोंडो यांच्यासह इतर पुजारी बांधवांनी केली आहे.

तुळजापूर शहराचे आजचे स्वरूप आणि महत्त्व कोणत्याही प्रकारे कमी होता कामा नये याचा यात्रा व्यवसायावर परिणाम होतो, ही बाब प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील या निमित्ताने दिला गेला आहे.

मंदिराच्या विकास प्रश्नामध्ये राजकारण न करता सर्व विकासाला करा जनतेसमोर आणि पुजारी मंडळासमोर स्पष्टपणे मांडला गेला पाहिजे लहानात लहान आणि मोठ्यात मोठी विकासात्मक योजना आदृश्य ठेवू नये, अशी मागणी या उपोषणाच्या आंदोलनामध्ये केली गेली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT