बेपत्ता महिलेचा खून; आरोपीची गुन्ह्याची कबुली  
सोलापूर

Tuljapur murder : बेपत्ता महिलेचा खून; आरोपीची गुन्ह्याची कबुली

तुळजापूर शहरात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : तब्बल चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तुळजापूर शहरातील एका ज्येष्ठ महिलेचा निर्घृण खून करून मृतदेह सोलापूर-धाराशिव रस्त्यावरील बायपास रोडवरील पुलाखाली झुडपात फेकल्याची घटना उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली.या गुन्ह्यातील आरोपीने स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर होवून केलेल्या कृत्याची कबुली दिली.

चित्रा पाटील (वय 65) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ओम निकम (वय 30) असे आरोपीचे नाव आहे. तुळजापूर शहरातील हुडको वसाहतीत राहणार्‍या पाटील या गेल्या 18 जुलैपासून बेपत्ता होत्या. त्या बेपत्ता असल्याची खबर पोलिसात देण्यात आली होती.पोलिसांनी तपास मोहीम सुरु केल्यानंतर 19 जुलै रोजी पोलिस सदर महिलेच्या शेजारी, पाजारी चौकशीस गेले असता संशयित आरोपीने पहिल्यांदा पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली होती.20 जुलै रोजी ओम निकम हा स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला व त्याने सदर महिलेचा खून आपणच केल्याची कबुली दिली.त्याने महिलेचा खून का आणि कशासाठी केला? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. दरम्यान, मयत महिलेचे हात बांधलेल्या अवस्थेत होते. या खुनाच्या घटनेबाबत तुळजापूर व परिसरात नागरिकांतून चर्चा होताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT