सोलापूर

Tuljabhavani temple news: तुळजाभवानी मातेला रंग लावून पुजाऱ्यांनी साजरा केला रंगोत्सव !

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात रविवारी रंगपंचमीचा सोहळा उत्साहात पार पडला

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात रविवारी रंगपंचमीचा सोहळा उत्साहात पार पडला. प्रातःकाली मंदिर उघडल्यानंतर मातेचे चरणतीर्थ पार पडून देवीला पंचामृत अभिषेक झाला.

देवीला भरजरी पांढरे वस्त्र परिधान करून अलंकाराचा साज चढविण्यात आला. त्यानंतर मातेच्या मूर्तीवर नैसर्गिक सप्तरंगांची मुक्त हस्ते उधळण करण्यात आली. यावेळी महंत व पुजाऱ्यांनी एकमेकांसह देवी दर्शनार्थ आलेल्या भक्तांना रंग लावून रंगोत्सव साजरा केला. महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, मंदिराचे सहायक धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले आदींची यावेळी उपस्थिती होती.

रविवारी शासकीय सुट्टीचा दिवस असल्याने रंगपंचमीच्या निमित्ताने देवी दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय होती. श्री तुळजाभवानी माता ही स्त्रीशक्तीचे स्वरूप आहे आणि योगायोगाने जागतिक महिला दिनही साजरा झाला. मातेच्या विशेष पूजेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवित महिलांनी सप्तरंगांत न्हाऊन निघत मुक्त हस्ते विविध रंगांची उधळण केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT