Solapur Crime News Pudhari
सोलापूर

Solapur Crime: ट्रकचालकास मारहाण; टोल कर्मचाऱ्यांवर गुन्हा

टोल नाक्याचे नुकसान केल्याप्रकरणी 15 जणांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

पोखरापूर : मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर टोल नाक्यावर मंगळवारी (दि. 24) ट्रकचालक व टोल नाक्याचे कर्मचारी यांच्या झालेल्या मारहाणप्रकरणी व टोल नाक्याची तोडफोड केल्याप्रकरणी परस्परांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

ट्रक ओव्हरलोडचे अतिरिक्त 85 रुपये भरण्यास नकार दिल्यानेफिर्यादी चालक सिद्धलिंगय्या राचय्या स्वामी (रा. सस्तापूर, जि. बिदर) याला टोल कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती. त्यांच्या मांडीवर वार केले. त्यांच्या फिर्यादीवरून नवनीत डांगे (रा. मडकी वस्ती, पुना नाका, सोलापूर) व धनराज हाके (रा. जुना तुळजापूर नाका, सोलापूर) या टोल कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

टोलनाक्याचे व्यवस्थापक पवनकुमार राजेंद्रकुमार ब्राह्मण (रा. शिंगपूर, जि. कन्नोज, उत्तर प्रदेश) यांच्या फिर्यादीनुसार, ट्रकचालक स्वामी यांचा ट्रक ओव्हरलोड असल्याने कर्मचारी धनराज हके यांनी त्यास ओव्हरलोड पेनल्टी 85 रुपये भरण्यास सांगितले. पण चालकाने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यावरून वाद झाला. त्यादरम्यान इतर चालकांनी टोल बूथच्या काचा, कॉम्प्युटर, कॅमेरे, इतर साहित्य, ऑफिसच्या काचा फोडून अंदाजे 20 ते 25 लाख रुपयांचे नुकसान केले.

याप्रकरणी शरदकुमार अशोक तांबोळे (रा. सस्तापूर, जि. बिदर), सुनील दिलीप मेटकरी (रा. भोसे, ता. मंगळवेढा), सिद्धलिंगय्या स्वामी यांच्यासह इतर 10 ते 12 लोकांविरुद्ध मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT