शेतात काम करताना वीज कोसळून तरूणाचा दुर्देवी मृत्‍यू file photo
सोलापूर

शेतात काम करताना वीज कोसळून तरूणाचा दुर्देवी मृत्‍यू

शेतात बांधकामांकरिता आलेली वाळू खाली करून घेत असताना ३८ वर्षीय तरुणावर वीज कोसळल्याने मृत्यू, मोहोळ तालुक्यातील आढेगाव येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

Tragic Death of a Young Man Struck by Lightning While Working in the Field

पोखरापूर : पुढारी वृत्तसेवा

शेतात बांधकामाकरीता आलेली वाळु खाली करुन घेत असताना ३८ वर्षीय तरुणाच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मोहोळ तालुक्यातील आढेगाव येथे दि.१७ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. विजय राजाराम डोंगरे असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विजय डोंगरे याने चुलते दिनकर शामराव डोंगरे यांना फोन करून वाळुची गाडी आली आहे असे सांगुन ती बांधकामाच्या ठिकाणी वस्तीवर खाली करुन घेतो असे सांगितले.

त्यानंतर काही वेळाने दिनकर डोंगरे यांनी पुतण्या विजय यास वाळुची गाडी खाली झाली का? याबाबत विचारण्याकरीता फोन केला असता फोन लागला नाही. त्यामुळे त्यांनी तेथेच राहणाऱ्या अजय डोंगरे याला फोन केला असता त्याने सांगीतले की, विजय हा वस्तीवरील बांधकामाजवळ वाळुची गाडी खाली करीत असताना त्याच्या अंगावर वीज पडुन त्यात तो बेशुध्द झाला आहे.

त्यावेळी दिनकर डोंगरे यांनी तात्काळ विजय डोंगरे याला उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे घेवुन येण्यास सांगितले. त्यानंतर विजय डोंगरे रा आढेगाव ता. मोहोळ यास ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तपासुन उपचारापुर्वीच त्‍याचा मृत्‍यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी दिनकर शामराव डोंगरे यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात खबर दिली असून अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT